आयफोनमध्ये ड्युअल सिम कसे वापराल? नवे आहे पण खूप सोपेही आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 06:20 PM2018-11-22T18:20:33+5:302018-11-22T19:26:18+5:30

ड्युअल सिम कसे वापरावे याचीच माहिती अद्याप नसल्याने अॅपलप्रेमी बुचकळ्यात पडले आहेत.

How to use dual SIM in iPhone? New but it's a lot easier ... | आयफोनमध्ये ड्युअल सिम कसे वापराल? नवे आहे पण खूप सोपेही आहे...

आयफोनमध्ये ड्युअल सिम कसे वापराल? नवे आहे पण खूप सोपेही आहे...

googlenewsNext

अॅपलने नुकत्याच लाँच केलेल्या तीन आयफोनमध्ये पहिल्यांदाच ड्युअलसिमचे फिचर दिले आहे. मात्र, यामध्ये एक सिम जीएसएम आणि दुसरे ई सिम असणार आहे. iPhone XS, XS Max आणि XR हे तीन फोन भारतात मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ड्युअल सिम कसे वापरावे याचीच माहिती अद्याप नसल्याने अॅपलप्रेमी बुचकळ्यात पडले आहेत. चला जाणून घेऊयात ही प्रक्रिया नेमकी किती किचकट आहे....


अॅपलच्या या नव्या फोनपैकी कोणताही फोन घेतल्यास पहिल्यांदा अॅपलची आयओएस व्हर्जन iOS 12.1 अपडेट करावे लागणार आहे. यानंतर या फोनवर पहिले सिम नॅनो जीएसएम आणि दुसरे ई सिम असणार आहे. अपडेट केल्यानंतर सध्यातरी केवळ दोनच कंपन्या ई सिमची सुविधा पुरविणार आहेत. त्या म्हणजे एअरटेल आणि जिओ. 


नॅनो सिमसाठी स्लॉट दिलेला आहे. मात्र, ई सिम हे अदृष्य असणार आहे. ई सिमला एम्बेडेड सबस्क्रायबर मॉड्यूल म्हटले जाते जे सॉफ्टवेअरद्वारे काम करते. यासाठी नवीन सिम खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एअरटेल सध्या ही सुविधा केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठी देत आहे. तर जिओ पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांनाही ही सुविधा देत आहे. 


ई सिम कसे वापरावे....
जिओ किंवा एअरटेल गॅलरीमध्ये गेल्यावर तेथे क्युआर कोड दिला जातो. यानंतर सेटिंगमध्ये जाऊन 'Cellular' वर क्लीक करावे. यानंतर 'Add Cellular Plan' वर जावे. येथे टेलिकॉम कंपनीने दिलेला क्यूआरकोड स्कॅन करावा. यावेळी जर कन्फर्मेशन कोड मागण्यात येत असेल तर टेलिकॉम कंपनीने दिलेला नंबर टाकावा. 


कॉलिंगवेळी सिम कसे निवडावे
कॉलिंगवेळी आदी डायल पॅड ओपन करावे. यानंतर नंबर डायल करून वरती दिसणाऱ्या आयकॉनवर प्रायमरी किंवा सेकंडरी ऑप्शन निवडावा.


मेसेजसाठी कसे निवडावे
मॅसेज करण्यासाठी सेटिंगमधील मेसेजवर जाऊन 'iMessage & FaceTime Line' वर जावे. यानंतर नंबर निवडावा.
 

Web Title: How to use dual SIM in iPhone? New but it's a lot easier ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.