मोहजालात फसू नका; ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करताना 'या' चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 06:48 PM2018-07-16T18:48:25+5:302018-07-16T18:51:23+5:30

आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत.

how to secure online transaction during flipkart amazon sales follow these steps | मोहजालात फसू नका; ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करताना 'या' चुका टाळा!

मोहजालात फसू नका; ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करताना 'या' चुका टाळा!

googlenewsNext

आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. त्या वापरून आपण सुरक्षितपणे ऑनलाईन शॉपिंग करू शकतो आणि फसवणुकीपासून दूर राहू शकतो. 

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन नामांकित ई-कॉमर्स वेबसाइट्सने बिग शॉपिंग डे आणि प्राईम डे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये मनसोक्त आणि सुरक्षित शॉपिंग करण्यासाठी काही क्षुल्लक चुका टाळणं गरजेचं असतं. अनेक जण बऱ्याचदा  ऑनलाईन सेल सुरू होण्यापूर्वीच प्रोडक्ट्स 'अॅड टू कार्ट' करतात. परंतु, सेल सुरू होण्याआधी कोणतीही वस्तू 'आउट ऑफ स्टॉक' होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घाईतून कुठल्या वस्तूला किती मागणी आहे, याचा अंदाज कंपन्या बांधतात आणि वस्तूंच्या किंमती ठरवतात.

सेल सुरू करण्यामागील विक्रेत्याचा मुख्य हेतू हा सेलमधून जास्तीत जास्त नफा मिळवणे आणि त्याची उत्पादने विकणे हाच असतो. मात्र, विक्रेत्यांच्या कोणत्याही आमिषांना बळी न पडता आपले पैसे सुरक्षित आणि योग्य पद्धतीने खर्च करणे ही आपली जबाबदारी असते. त्या दृष्टीने काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.


प्रचंड सूट देण्याऱ्या जाहिराती - 

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर घरगुती उत्पादनांवरील सवलतींच्या जाहिराती खूप सामान्य असतात. तसेच इतरही अनेक ऑफर्स देण्यात येतात. 30 टक्के डिस्काउंट किंवा त्याहीपेक्षा अधिक आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. या प्रकरणांमध्ये दोन ट्रॅप असतात. त्यातील एक म्हणजे असा की, ऑफर्स फक्त काही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सवर देण्यात येतात. तर काही प्रॉडक्ट्स नवीन आहेत असे सांगून त्यावर ही ऑफर लागू होत नाही असे सांगण्यात येते. यामध्ये असा हेतू असतो की, ग्राहक या ऑफर्सना बळी पडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतील. तसेच ज्यांच्याकडे आधीपासूनच कार्ड आहेत ते अधिक खरेदी करण्यास प्रवृत्त होतील. 

एक्सचेंज डिस्काउंट -

अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स थेट सवलत देण्याऐवजी त्यांच्या पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या नवीन उत्पादनांसोबत एक्सचेंज ऑफर देतात. आपल्यापैकी अनेक जण या ऑफरची निवड करतात. 

प्लाइटच्या दरामध्ये सवलत -

ही ऑनलाईन शॉपिंगमध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारी ट्रिक आहे. तुम्हाला एखादा मेल येतो. ज्यामध्ये तुम्हाला फ्लाईटचं तिकीट 2,000 रुपयांमध्ये दिल्याचं भासवलेलं असते. अशा जाहिरातींमध्ये फक्त अर्धवट माहिती देण्यात येते. जेव्हा ग्राहक खरी जाहिरात पाहतात. त्यावेळी वेगळीच किंमत असते.  

मर्यादित कालावधीच्या ऑफर्स - 

ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना खिळवून ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. तसेच बऱ्याचदा ग्राहकांना मर्यादित ऑफर सांगून खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. तुम्ही अॅप ओपन केल्यानंतर वर तुम्हाला अशा ऑफर्सचे बॅनर दिसतात. किंवा तुम्हाला पॉप अप नोटिफिकेशन पाठवण्यात येतात. अशा जाहिराती ग्राहकांना लवकर स्वतःकडे खेचून घेतात. तसेच यामुळे बऱ्याचदा लोक चुकीचे आणि नको असलेले उत्पादन विकत घेतात.

Web Title: how to secure online transaction during flipkart amazon sales follow these steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.