YouTube झाले हॅक? चॅनलवरील Despacito गाणे डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:40 PM2018-04-10T18:40:25+5:302018-04-10T18:40:25+5:30

सोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, YouTube चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट करण्यात आली आहे. यामध्ये लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito या गाण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या या गाण्याला YouTube चॅनलवर सर्वाधिक जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

Hacked YouTube? Despacito song delete on Channel | YouTube झाले हॅक? चॅनलवरील Despacito गाणे डिलीट

YouTube झाले हॅक? चॅनलवरील Despacito गाणे डिलीट

Next
ठळक मुद्देसोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito गाण्याचा समावेश

नवी दिल्ली : सोशल मीडियातील YouTube चॅनल हॅक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, YouTube चॅनलवरुन सर्वाधिक हाय प्रोफाईल गाणी डिलीट करण्यात आली आहे. यामध्ये लुईस फॉन्सी आणि डॅडी यॅन्की यांच्या Despacito या गाण्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या या गाण्याला YouTube चॅनलवर सर्वाधिक जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 
मंगळवारी सकाळच्या सुमारास YouTube चॅनलवरील Despacito गाण्याचे थंबनेल बदलण्यात आले होते. तसेच, त्याजागी हातात बंदुक आणि मास्क असलेल्या एका गॅंगचा फोटो ठेवण्यात आला होता. याशिवाय, द वर्जने दिलेल्या माहितीनुसार,  व्हिडीओचे डिस्क्रिप्शन सुद्धा बदलण्यात आले होते. दरम्यान, ही बातमी समजताच  Despacito गाणे YouTube चॅनलवरुन हटविण्यात आले आहे.
दुसरीकडे, YouTube चॅनल हॅक केल्याची जबाबदारी Prosox आणि Kuroi’sh असे नाव असलेल्या हॅकर्सनी स्वीकारली आहे. याशिवाय अन्य काही लोकप्रिक व्हिडिओ हॅकर्सकडून बदलण्यात आले होते. यामध्ये क्रिस ब्राऊन, शकिरा, डीजे स्नैक, सेलेना गोमेज, केटी पेरी आणि टेलर स्विफ्ट यांच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यांची गाणी YouTube चॅनलवर आहेत. मात्र, या गाण्याचे थंबनेल आणि टायटल बदलले आहे. दरम्यान, YouTube चॅनल हॅक झाल्याच्या वृत्ताला गूगलकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही आहे.
 

Web Title: Hacked YouTube? Despacito song delete on Channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.