गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 09:59 AM2018-08-07T09:59:12+5:302018-08-07T10:49:59+5:30

गुगलचे फोन आजपासून अपडेट होणार

Googles latest mobile OS android p formally launched | गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

गुगलकडून अँड्रॉईड पाय लॉन्च; नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स

googlenewsNext

मुंबई: अँड्रॉईडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम गुगलकडून लॉन्च करण्यात आली आहे. 'अँड्रॉईड पी' असं या ऑपरेटिंग सिस्टिमचं नाव आहे. अँड्रॉईडच्या ऑपरेटिंग सिस्टिमला खाद्यपदार्थांची नावं दिली जातात. त्यानुसार नव्या सिस्टिमला पाय असं नाव देण्यात आलं आहे. ही नवी सिस्टिम आजपासून उपलब्ध होईल. त्यामुळे या सिस्टिमला सपोर्ट करणारे फोन आज अपडेट होतील. 

अँड्रॉईड पीमध्ये नवा इंटरफेस देण्यात आला आहे. याशिवाय या नव्या सिस्टिममध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यापैकी मशीन लर्निंग अॅल्गोरिदम हे फिचर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामुळे मोबाईलचा ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट होतो. मोबाईल फोन वापरकर्त्याच्या सवयीनुसार, त्याच्या प्राधान्यक्रमानुसार ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट केला जातो. याशिवाय फोनची बॅटरीदेखील अॅडजस्ट होते. युजरच्या सवयीनुसार सॉफ्टवेअरमध्ये अॅडजस्टमेंट करुन त्यानुसार बॅटरी चार्ज करण्याची क्षमता नव्या सिस्टिममध्ये आहे. 

मोबाईल युजरच्या कृतीवरुन पुढील टास्कसाठी सज्ज राहण्याची क्षमतादेखील अँड्रॉईड पीमध्ये आहे. त्यामुळे युजरने मोबाईलला हेडफोन कनेक्ट करताच त्याच्यासमोर प्लेलिस्ट ओपन होते. अँड्रॉईड पीला सपोर्ट करणाऱ्या गुगलच्या फोनवर आजपासून ही सिस्टिम उपलब्ध असेल. त्यामुळे गुगलचे फोन आजपासून अपडेट होतील. मात्र वन प्लस, सोनी, एमआय, ओप्पो आणि विवो कंपन्यांचे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत अपडेट होतील. 

Web Title: Googles latest mobile OS android p formally launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.