Gmail आता नव्या रुपात, अद्ययावत फीचरसह ऑफलाइन व्हर्जनही लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:52 PM2018-04-26T12:52:26+5:302018-04-26T12:52:26+5:30

गुगलने जीमेल या त्यांच्या मेल सर्व्हिसमध्ये पूर्णपणे बदल केले आहेत.

google launch new gmail, know here how to use and what are the new features | Gmail आता नव्या रुपात, अद्ययावत फीचरसह ऑफलाइन व्हर्जनही लॉन्च

Gmail आता नव्या रुपात, अद्ययावत फीचरसह ऑफलाइन व्हर्जनही लॉन्च

मुंबई- गुगलने जीमेल या त्यांच्या मेल सर्व्हिसमध्ये पूर्णपणे बदल केले आहेत. जीमेलने युजर्ससाठी नवे फीचर्स आणले आहेत. हे नवे फीचर युजर्सला जास्त जलद, सुरक्षित सर्व्हिस देणारे आहेत. 

नव्या अपडेटसाठी रोलआऊट सुरु झालं असून पुढील काही आठवड्यात सगळ्या युजर्सना नवे फीचर वापरता येतील. नेहमीच्या जीमेल युजर्सला हे नवं फीचर वापरण्यासाठी  ‘Try new Gmail’ वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर हे नवं जीमेल वापरता येणार आहे. 

हे आहेत जीमेलमधील नवे फीचर

- जीमेल इनबॉक्समध्ये जेव्हा तुम्ही कुठल्याही इमेल कन्व्हर्सेशनवर कर्सर आणाल तेव्हा तेथे आर्काइव्ह, डिलीट, मार्क रीड, आणि स्नजू हे ऑप्शन दिसतील. यातील स्नूज हे फंक्शन नवं आहे. हे फंक्शन वापरून तुम्ही इमेल काही वेळाने पाठविण्यासाठी सेट करु शकता. तिथेच डाव्या बाजूला तुम्हाला कीप, टास्क्स आणि गुगल कॅलेंडरसारखे ऑप्शन मिळतील. 

- हाय-प्रोफाइल नोटीफीकेशन फीचर या अपडेटमध्ये आहे. ज्यामध्ये नोटीफीकेशनसाठी फिल्टर सेट करता येइल. जे मेल्स महत्त्वाचे आहेत त्याचं नोटीफीकेशन या फीचरमुळे मिळेल.या फीचरमुळे पुश नोटीफीकेशनची संख्या 97 टक्के कमी होइल, असं गुगलचं म्हणणं आहे. 

- आलेल्या मेलमध्ये अटॅचमेंट आहे की नाही हे आता मेल न उघडला इनबॉक्समध्ये गेल्यावरच समजणार आहे. मेसेजच्या खाली एक आयकॉन असेल त्यावर क्लिकरून अटॅचमेंट पाहता येइल. 

- जीमेलचं एक ऑफलाइन व्हर्जनही उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे इंटरनेट नसतानाही युजर्सला काम करता येइल. म्हणजेच तुमचा मेल सिंक केला जाइल आणि इंटरनेट उपलब्ध झाल्यावर डाऊनलोड होइल. 

Web Title: google launch new gmail, know here how to use and what are the new features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.