जीपीएस ऑफ असतानाही गुगलला कळते आपले लोकेशन !

By शेखर पाटील | Published: November 23, 2017 01:54 PM2017-11-23T13:54:20+5:302017-11-23T13:55:28+5:30

गुगल जीपीएसचा वापर करून युजर्सचे लोकेशन मिळवू शकते हे आपल्याला माहिती आहेच. तथापि, जीपीएस ऑफ असताना व अगदी स्मार्टफोनमध्ये सीमकार्ड नसले तरी स्मार्टफोनधारकाचे लोकेशन गुगलला मिळत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

google know your location even when location services were turned off | जीपीएस ऑफ असतानाही गुगलला कळते आपले लोकेशन !

जीपीएस ऑफ असतानाही गुगलला कळते आपले लोकेशन !

googlenewsNext

गुगल तसेच अन्य कंपन्यांकडे आपली डिजीटल कुंडली असते ही बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. यावरून अनेकदा चर्वण होत असले तरी एकंदरीतच या प्रकाराकडे कुणी फारसे गांभिर्याने पाहत नाही. तथापि, क्वार्टझ् या पोर्टलने गेल्या ११ महिन्यांपासून केलेल्या अध्ययनातून एक संवेदनशील माहिती समोर आली आहे. यानुसार कोणत्याही स्मार्टफोनधारकाचा मोबाइल बंद असला, त्याने जीपीएस बंद केलेले असले, त्याने कोणतेही अ‍ॅप वापरले नाही, एवढेच नव्हे तर त्याने स्मार्टफोनमध्ये सीमकार्डही टाकलेले नसले तरी गुगलला त्याचे लोकेशन कळत असल्याचे दिसून आले आहे. अँड्रॉइड ही प्रणाली गुगलच्या सर्व्हरकडे ही माहिती पाठवत असते. यासाठी टॉवर लोकेशनचा वापर करण्यात येतो. अँड्रॉइड प्रणाली प्रत्येक स्मार्टफोनधारक नेमक्या कोणत्या मोबाईल टॉवरशी कनेक्ट आहे याची माहिती सहजपणे मिळवत असते. नेमकी हीच माहिती गुगल कंपनीच्या सर्व्हरकडे सातत्याने पाठवत असते. वर नमूद केल्यानुसार मोबाइल हा बंद अवस्थेत असला तरी तो जेव्हाही सुरू होतो तेव्हा माहिती पाठविली जाते.

विशेष बाब म्हणजे क्वार्टझ्ने याबाबत गुगलशी संपर्क साधला असता त्यांच्या प्रवक्त्याने आपल्याकडे लोकेशनची माहिती येत असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. तथापि, ही माहिती एनक्रिप्टेड अर्थात पूर्णपणे सुरक्षित असून गुगलने याचा आजवर गैरवापर केला नसल्याचा युक्तीवाददेखील गुगल कंपनीच्या प्रवक्त्याने केला आहे. एवढेच नव्हे तर येत्या काही दिवसांतच गुगल ही माहिती जमा करण्याची प्रणालीच नष्ट करणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे. मात्र यातून जगभरातील अब्जावधी अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सच्या गोपनीयतेची एैशीतैशी झाल्याचे अधोरेखित झाले हे मात्र निश्‍चत !
 

Web Title: google know your location even when location services were turned off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.