या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:55 PM2018-12-11T12:55:02+5:302018-12-11T12:56:43+5:30

आपल्यापैकी अनेक जणांना आपला मोबाईल विसरण्याची सवय असते. अशातच अनेकदा आपण आपल्या फोन कुठेतरी विसरून. कधी तो परत मिळतो, तर कधी तो परत मिळतचं नाही.

Google and levis developed smart jacket which tells you if you have forgotten your smartphone | या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा!

या स्मार्ट जॅकेटशी नातं जोडा; मोबाईल हरवण्याची चिंता सोडा!

Next

आपल्यापैकी अनेक जणांना आपला मोबाईल विसरण्याची सवय असते. अशातच अनेकदा आपण आपल्या फोन कुठेतरी विसरून. कधी तो परत मिळतो, तर कधी तो परत मिळतचं नाही. फक्त फोनच नाही तर फोनमधील सर्व डेटा, कॉ़न्टॅक्ट नंबर्सही हरवतात. यामुळे फार त्रास सहन करावा लागतो. पण आता तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण आता तुमचा फोन कधी हरवणारचं नाही. 

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. प्रत्येक तासागणिक तंत्रज्ञानात उल्लेखनिय प्रगती होताना दिसत आहे. अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी असलेले गॅजेट्स बाजारात उपलब्ध होत असतात. आपल्यासाठी असलेले हे गॅजेट्स अनेक कामं सोपी करण्यासाठी उपयोगी पडतात. आता असचं एक गॅजेट जॅकेट बाजारात येऊ घातलं आहे. Google आणि Levis यांनी एकत्र येऊन हे जॅकेट तयार केलेलं असून हे जॅकेट तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करता येणार आहे. आता तुम्ही म्हणला की या जॅकेटचा नक्की उपयोग काय? हे जॅकेट तुमचा स्मार्टफोन हरवूच देणार नाही. या जॅकेटच्या स्लीव्ह्सवर एक सिग्नेचर स्लिव्ह टॅग लावण्यात आलेला आहे. त्याद्वारे हे जॅकेट स्मार्टफोनशी कनेक्टेड राहणार आहे. 

स्मार्टफोनमधील म्युजिकही करणार कंट्रोल 

द वर्जने दिलेल्या रिपोर्टनुसार, Jacquard नावाच्या या स्मार्ट जॅकेटमध्ये ऑलव्हेज टुगेदर फिचर अॅड केलेलं आहे. हे फिचरद्वारे फोन तुमच्यापासून दूर गेल्यानंतर जॅकेटच्या कफवर लावण्यात आलेल्या signature sleeve tag वर सिग्नल पाठवण्यात येतो. ज्यामुळे हा टॅग ब्लिंक करण्यासोबतच वायब्रेटही करू लागतो. तसेच स्मार्ट जॅकेटच्या मदतीने म्युजिकही कंट्रोल करणं शक्य होणार आहे. तसेच मॅपवर राइड शेयरिंग अलर्ट्सही देता येणार आहे. याची किंमत 350 अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 25 हजार रूपये ठेवण्यात आली आहे. 

Web Title: Google and levis developed smart jacket which tells you if you have forgotten your smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.