खूशखबर! आता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 02:59 PM2018-02-12T14:59:34+5:302018-02-12T15:00:07+5:30

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे.

Good news! Now send money via WhatsApp | खूशखबर! आता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा पैसे 

खूशखबर! आता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा पैसे 

Next

मुंबई -  डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून आता पैशाची देवाण-घेवाण करता येणार आहे. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून UPI वापरायची परवानगी व्‍हॉट्‍सॲपला देण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे UPI द्वारा व्हॉटस्ऍपच्या माध्यमातूनही ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. मात्र सध्या तरी हि सुविधा फक्त बीटा व्हर्जनसाठी आहे. 

अॅन्ड्रॉइडच्या 2.18.41 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं आहे. तर iOS यूजर्सला पेमेंटचे अपडेट V2.18.21 या व्हर्जनवर उपलबद्ध असेल. व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.  काही युजर्सनं याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 



 

कसे होतील पैसे ट्रान्सफर?
 या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. यात सेटिंगमध्ये तुम्हाला एक नवीन टॅब मिळेल. ज्यात पेमेंटचा पर्याय देण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या बॅंक अकाऊंटचा वापर करुन युपीआयशी जोडू शकता. येथे तुम्हाला नवा ऑथेंटिकेशन पिन मिळेल. या नंतर तुम्ही यातून बॅंकेचे नाव सिलेक्ट करुन पेमेंट करु शकता. मात्र यासाठी दोन्ही युजर्सकडे हे पेमेंट फिचर असणे आवश्यक आहे. 



 

दरम्यान,  वीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात. परंतू आता व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू केली आहे सध्या व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत. यापूर्वी  व्हॉट्सअॅपने इंस्टंट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केली होती. तसेच 2016 मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआय सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाइल युझर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.

Web Title: Good news! Now send money via WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.