जिओ फोनची प्री-बुकिंग झाली सुरू; 500 रूपयात होणार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 09:31 AM2017-08-24T09:31:24+5:302017-08-24T17:35:47+5:30

रिलायन्स कंपनीच्या बहुचर्चित जिओ फोनची प्री-बुकिंग गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली.

Geo Phone will be pre-booking starting at 5 pm this evening; Booking will take place in 500 rupees | जिओ फोनची प्री-बुकिंग झाली सुरू; 500 रूपयात होणार बुकिंग

जिओ फोनची प्री-बुकिंग झाली सुरू; 500 रूपयात होणार बुकिंग

ठळक मुद्दे रिलायन्स कंपनीच्या बहुचर्चित जिओ फोनची प्री-बुकिंग गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे.प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोनची निर्मिती करण्याचं लक्ष रिलायन्सने समोर ठेवलं आहे. 

मुंबई, दि. 24- रिलायन्स कंपनीच्या बहुचर्चित जिओ फोनची प्री-बुकिंग गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली. 50 कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे. हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे. तसंच प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोनची निर्मिती करण्याचं लक्ष रिलायन्सने समोर ठेवलं आहे. 

कंपनीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिओफोनची बुकिंग 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सुरू होईल. या फोनचं प्री-बुकिंग करण्यासाठी ग्राहकाला 500 रूपये भरावे लागणार आहेत. रिलायन्सच्या वेबासाइटवर, मायजिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये फोनचं प्री-बुकिंग केलं जाईल. कंपनीने या फोनची किंमत सिक्युरिटी डिपॉझिटच्या माध्यमातून 1500 रुपये ठेवली आहे, तीन वर्षांनंतर या पैशांचा पूर्ण रिफंड ग्राहकांना मिळणार आहे. प्री बुकिंग करतान ग्राहकांना 500 रूपये भरावे लागणार आहेत. तर उर्वरीत 1000 रूपये फोन मिळाल्यानंतर भरायचे आहेत. 

जिओफोनमध्ये ग्राहकांना मिळणार हे फिचर्स
जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे,या फोनवर व्हॉइस कॉलिंग मोफत मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.
रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर 128 जीबी मेमरी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट दिली आहे. तर 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल. 

जिओच्या फोनवर दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रुपयांना मिळणार असून, आठवड्याचा प्लॅनसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ फोनच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही केबल पाहता येणार असून, त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 309 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या व्हॉइस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी विविध फिचर देण्यात आले आहेत. जिओ फोन हा भारतीय बनावटीचा आहे. 

Web Title: Geo Phone will be pre-booking starting at 5 pm this evening; Booking will take place in 500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.