विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ

By शेखर पाटील | Published: August 13, 2018 03:20 PM2018-08-13T15:20:01+5:302018-08-13T15:21:14+5:30

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक या मॉडेलमध्ये संगीताचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Garmin Vivoactive 3 Music With GPS, Heart Rate Monitor, Garmin Pay Features Launched in India at Rs. 25990 | विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ

googlenewsNext

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक हे मॉडेल नुकतेच बाजारपेठेत दाखल झाले असून यात स्मार्टवॉचसह म्युझिक प्लेअरचा मिलाफ करण्यात आला आहे. वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या क्षेत्रात गार्मीनचे नाव आघाडीवर आले. गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी विविध प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यात आता विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक या मॉडेलची भर पडली आहे. कंपनीने आधीच बाजारपेठेत उतारलेल्या विवोअ‍ॅक्टीव्ह ३ जीपीएस या मॉडेलची ही सुधारित आवृत्ती असल्याचे दिसून येत आहे. अर्थात यात मूळ मॉडेलपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. याचे मूल्य २५,९९० रूपये इतके असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे. 

ऑनलाईनचा विचार केला असता, गार्मीनचे ऑनलाईन स्टोअर, पेटीएम मॉल, अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि हेलिओसवॉचस्टोअर.कॉम या पोर्टल्सवर हा उपलब्ध आहे. तर क्रोम, रिलायन्स डिजिटलसह अन्य आघाडीच्या शॉपिजमधून याला ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे. वास्तविक पाहता अन्य स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्सच्या तुलनेत याचे मूल्य खूप जात असल्याचे दिसून येत आहे. तथापि, यातील फिचर्सही याच तोलामोलाचे असल्याचे विसरता येणार नाही.

नावातच नमूद असल्यानुसार विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक या मॉडेलमध्ये संगीताचा सपोर्ट देण्यात आला आहे. ही याची खासियत मानली जात आहे. यात जवळपास ५०० गाणे स्टोअर करण्याची सुविधा दिलेली आहे. ही गाणी युजरला ऐकता येणार आहे. यासोबत युजर ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोनवरील गाणीदेखील यावरून ऐकू शकतो. तसेच यात असणार्‍या संगीताला ब्लुटुथ स्पीकरवरही ऐकण्याची सुविधा यामध्ये आहे. याशिवाय यात हार्ट रेट मॉनिटरही देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या हृदयाच्या ठोक्याचे मापन करू शकतो. तर यामध्ये जीपीएसची सुविधा असल्यामुळे युजरला लाईव्ह लोकेशन यातून कळणार आहे. यात गार्मीन पे या प्रणालीचा सपोर्ट दिलेला आहे. याच्या मदतीने युजर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकतो. यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल सात दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे कुणीही अगदी पोहतानाही याचा सहजपणे वापर करू शकतो. यातील डिस्प्ले हा १.२ इंच आकारमानाचा आणि २४० बाय २४० पिक्सल्स क्षमतेचा आहे.

Web Title: Garmin Vivoactive 3 Music With GPS, Heart Rate Monitor, Garmin Pay Features Launched in India at Rs. 25990

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.