Galaxy Tab A 7.0: Learn all the features | गॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी आपला गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट ९,५०० रुपये मूल्यात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलची खासियत म्हणजे यातील ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी होय. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ९ तासांचा व्हिडीओ प्ले-बॅक देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अलीकडच्या काळात व्हिडीओचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून पर्यायाने चांगली बॅटरी हा महत्वाचा घटक बनला आहे. या पार्श्‍वभूमिवर, गॅलेक्सी टॅब ए ७.० या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आल्याचे मानले जात आहे. या टॅबलेटमध्ये ७ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्सचा असेल. याची रॅम १.५ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते २०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा यात दिलेला आहे.

गॅलेक्सी टॅब ए ७.० हा टॅबलेट मुलांनाही सुरक्षितपणे वापरता यावा याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी यात पेरेंटल कंट्रोलची सुविधा दिलेली आहे. यात मुलांना किती वेळ आणि नेमके कोणते फिचर्स/अ‍ॅप्स वापरता येतील यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तर याच्या जोडीला किडस मोडच्या माध्यमातून मुलांना उत्तमोत्तम शैक्षणिक फिचर्स वापरता येतील. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

गॅलेक्सी टॅब ए ७.० हे मॉडेल काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यासोबत कंपनीने काही आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात रिलायन्सच्या जिओचे २९९ रूपयांचे रिचार्ज करणार्‍या युजरला जिओमनीवर २ हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. अर्थात हा कॅशबॅक १२ महिन्यानंतर ८०० रूपये तर २४ महिन्यानंतर १२०० रूपये या दोन टप्प्यांमध्ये मिळेल. मात्र यासाठी दरम्यानच्या कालखंडात युजरला दरमहा जिओचे रिचार्ज करावे लागणार आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.