चार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:52 PM2018-01-17T16:52:11+5:302018-01-17T16:56:40+5:30

वावेचा सब-ब्रॅण्ड ऑनर इंडिया कपंनीने आपला आणखी एक 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 21 जानेवारीपासून ठराविक वेळेत फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

Four Camer Honor 9 Lite Launches In India, Learn Price! | चार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!

चार कॅमेरे असलेला Honor 9 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!

googlenewsNext
ठळक मुद्दे4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात केला लाँच21 जानेवारीपासून फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला लाँच होणार

मुंबई : वावेचा सब-ब्रॅण्ड ऑनर इंडिया कपंनीने आपला आणखी एक 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 21 जानेवारीपासून ठराविक वेळेत फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान, यामध्ये दोन मॉडेल असून 3 जीबी रॅम आणि 32 इंटरनल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी असणार आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन 14,999 रुपयांना आहे.  
भारतात लाँच झालेल्या या दोन्ही स्मार्टफोनचा कलर व्हेरियंट मिडनाइट ब्लॅक, ब्ल्यू आणि ग्लेशियर ग्रे असा आहे. याचबरोबर, 2160X1080 पिक्सेल रिझॉल्यूशन असलेला 5.65 इंचाचा डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर किरिन 659 प्रोसेसर असून अँड्राईड ओरिओ 8.0 या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा चालणार आहे.तसेच, दोन्ही स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. याशिवाय, या स्मार्टफोनची खाशियत म्हणजे यामध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहे. बॅक कॅमेरा 13 मेगा पिक्सल आणि 3 मेगापिक्सलचा आहे, तर फ्रंटला असणारे कॅमेरे सुद्धा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅश आहे. 
याचबरोबर, चार कॅमे-यांशिवाय या दोन्ही स्मार्टफोमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूट्युथ, वाय-फाय,  4G VoLTE, जीपीएस/ए-जीपीएस, मॉयक्रो-यूएसबी (ओटीजीसोबत) आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅकची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, 3000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने असा दावा केला आहे की, 3 जी नेटवर्कवर 20 तास टॉकटाइम आणि 24 चार स्टॅंडबाय टाइम बॅटरी पुरेल इतकी क्षमता आहे.  

Oppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला होणार लाँच
चीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे.  Oppo A83 हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने चीनमध्ये लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन फेस अनलॉक फिचरसोबत मार्केटमध्ये दाखल झाला होता. दरम्यान, या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे समजते. मात्र, मीडियाने दिलेल्या माहितीनुसार , Oppo A83 स्मार्टफोनची किंमत 13,990 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आल्यास Xiaomi Mi A1, Honor 7X आणि Samsung Galaxy On Max या स्मार्टफोनशी टक्कक देईल असे बोलले जात आहे. 

Web Title: Four Camer Honor 9 Lite Launches In India, Learn Price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.