Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:09 PM2018-12-24T17:09:24+5:302018-12-24T17:10:02+5:30

Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे.

flipkart mobiles bonanza sale get big discounts on smartphones | Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

Flipkart sale: 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार भरघोस सूट

Next

नवी दिल्ली : ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने सेल आणला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट ठेवला आहे. 26 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत या सेलचे आयोजन करण्यात येणार आहे. कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सेलच्या दरम्यान असणारे स्मार्टफोन्सचे Preview जारी करण्यात आले आहे. 
यामध्ये Realme 2 Pro, Asus Zenfone Max Pro M1, Nokia 5.1 Plus आणि Honor 9N या स्मार्टफोन्सवर सेल आहे. तसेच, या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयची सुविधा सुद्धा असणार आहे. 

... या आहेत टॉप डील्स :
- Realme 2 Pro स्मार्टफोन सेलमध्ये 12,990 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनची लॉन्चिंग किंमत 13,990 रुपये आहे.  
- Zenfone Max Pro M1 (32GB) हा स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 8,999 रुपयांना ग्राहक या सेलमध्ये खरेदी करु शकणार आहेत. यावर एक्सचेंग ऑफर आहे.  
- Honor 9N स्मार्टफोन 8,999 रुपयांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन घेताना ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला आहे.  
- Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन सेलदरम्यान 13,199 रुपयांऐवजी 9,999 रुपयांना मिळणार आहे.  
- Honor 7A स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 7,499 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकतील. या स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनलमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. 
- Samsung On8 (64GB)  हा स्मार्टफोन 19,999 रुपयांऐवजी  12,990 रुपयांना मिळणार आहे.
- Nokia 6.1 Plus ब्लॅकमध्ये ग्लास पॅनल आणि ड्युअल रिअर कॅमेरा असलेला नोकियाचा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलच्या  दरम्यान ग्राहकांना 17,600 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.  
- Motorola One Power हा स्मार्टफोन 18,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. 

Web Title: flipkart mobiles bonanza sale get big discounts on smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.