टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा

By शेखर पाटील | Published: January 1, 2018 09:37 AM2018-01-01T09:37:01+5:302018-01-01T09:37:34+5:30

टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे.

Feature of using Multiple Account on Telegram | टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा

टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा

टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे.
 
टेलिग्राम मॅसेंजरची ४.७ ही नवीन आवृत्ती अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. एका महिन्यातच या मॅसेंजरने दोन अपडेट सादर केल्याची बाब लक्षणीय आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट होय. सध्या पॅरलल स्पेससारख्या अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या मदतीने एका स्मार्टफोनवर टेलिग्रामचे दोन अकाऊंट वापरणे शक्य आहे. आता मात्र कोणत्याही बाह्य अ‍ॅपच्या मदतीविना ही सुविधा मिळणार आहे. ताज्या अपडेटमध्ये मल्टीपल अकाऊंटची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने एकाच स्मार्टफोनवर तीन विविध मोबाईल क्रमांकाने टेलिग्राम अकाऊंट वापरता येतील. या तिन्ही खात्यांचे नोटिफिकेशन्स त्या युजरला मिळतील. या नोटिफिकेशन्सला कस्टमाईज करण्याची सुविधाही असेल. तर साईडबारवर स्वाईप करून कुणीही आपल्याला हव्या त्या अकाऊंटचा वापर करू शकेल.
 
टेलिग्रामच्या ताज्या आवृत्तीत नवीन अ‍ॅपीअरन्स सेटींग देण्यात आली आहे. याचा वापर करून कुणीही चार थीम्सपैकी हव्या त्या थीमचा वापर करू शकतो. सध्या युजर्ससाठी चार थीम देण्यात आल्या आहेत. यात हव्या त्या थीमला कस्टमाईज करण्याची सुविधाही दिलेली आहे. तर ताज्या आवृत्तीत व्हाटसअ‍ॅपप्रमाणे क्विक रिप्लायची सुविधादेखील देण्यात आली आहे. कुणीही चॅटबॉक्समधील मॅसेजला डाव्या बाजूने स्वाईप करून यावर तात्काळ प्रतिक्रिया देऊ शकतो. पहिल्यांदा हे अपडेट आयओएस प्रणालीसाठी देण्यात आली आहे. अर्थात अँड्रॉइडचे अपडेटही लवकरच देण्यात येणार आहे.

(छायाचित्र सौजन्य :- टेलिग्राम ब्लॉग)

Web Title: Feature of using Multiple Account on Telegram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.