स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

By शेखर पाटील | Published: October 20, 2017 11:57 PM2017-10-20T23:57:41+5:302017-10-20T23:59:26+5:30

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप या सेवेच्या लाईट आवृत्तीवर ग्रुप व्हिडीओ कॉलींगसह अन्य फिचर्स देण्याची घोषणा केली आहे.

Feature of group video calling on Skype Lite app | स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

Next

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप या सेवेच्या लाईट आवृत्तीवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसह अन्य फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी खास भारतीयांसाठी स्काईप या अ‍ॅपची लाईट आवृत्ती लाँच करण्यात आली होती. हे अ‍ॅप आकारमानाने आटोपशीर असून ते इंटरनेटची गती संथ असतांनाही व्यवस्थित कार्यरत राहू शकते. आता याच लाईट आवृत्तीसाठी ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे स्काईपच्या मूळ आवृत्तीत ही सुविधा आधीपासूनच आहे. याशिवाय गुगल हँगआऊट, व्हायबर, लाईन, फेसबुक मॅसेंजर आदींमध्येही हे फिचर देण्यात आलेले आहे. आता हीच सुविधा स्काईप लाईटच्या अ‍ॅपमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी स्काईप लाईट हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेले नाही, अशा युजर्सलाही व्हिडीओ चॅटमध्ये सहभागी करण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आली आहे. यासाठी संबंधित युजरला व्हॉटसअ‍ॅप मॅसेज अथवा ई-मेलद्वारे २४ तासांसाठी व्हॅलिड असणारी इनव्हिटेशन लिंक पाठवता येणार आहे. यातून समोरच्या युजरला स्काईप लाईट अ‍ॅप अथवा वेबवरील याचे एक्सटेन्शन डाऊनलोड करण्याचे सूचित केले जाणार आहे. अर्थात यानंतर संबंधित युजरला ग्रुप व्हिडीओ चॅटमध्ये समाविष्ट करता येईल.

मायक्रोसॉफ्टने भारतात स्काईपचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच स्काईपला केंद्र सरकारच्या आधारशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे कुणाचेही ऑनलाइन ऑथेंटिकेशन सोपे झाले आहे. यानंतर मशिन लर्निंग तंत्रज्ञानाने युक्त असणारे एसएमएस इनसाईट हे विशेष फिचर देत स्पॅमर्सपासून मुक्तीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या स्काईप लाईटचे ५० लाखांच्या आता डाऊनलोड असल्याने भारतात स्थान निर्माण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टला खूप प्रयत्न करावे लागतील हे उघड आहे. या अनुषंगाने ग्रुप व्हिडीओ कॉलींगचे फिचर महत्वाचे ठरू शकते.

Web Title: Feature of group video calling on Skype Lite app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल