Facebook ने लॉन्च केलं डेटींग अॅप, टिंडरला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:36 PM2018-09-21T12:36:34+5:302018-09-21T12:37:21+5:30

जेव्हाही ऑनलाइन डेटींगचा विषय येतो तेव्हा सर्वांना टिंडर आणि बम्बल या अॅप्सची आठवण येते. पण आता या अॅप्सना टक्कर देण्यासाठी फेसबुक मैदानात उतरलं आहे. 

Facebook's new Dating service is ready to take on Tinder | Facebook ने लॉन्च केलं डेटींग अॅप, टिंडरला देणार टक्कर

Facebook ने लॉन्च केलं डेटींग अॅप, टिंडरला देणार टक्कर

Next

(Image Credit : spectrum.ieee.org)

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साइट  Facebook आतापर्यंत मित्रांना शोधण्यासाठी आणि नवीन मित्र बनवण्यासाठी वापरलं जात आहे. पण आता फेसबुक लवकरच तुम्हाला लाइफ पार्टनर शोधण्यासाठीही मदत करणार आहे. जेव्हाही ऑनलाइन डेटींगचा विषय येतो तेव्हा सर्वांना टिंडर आणि बम्बल या अॅप्सची आठवण येते. पण आता या अॅप्सना टक्कर देण्यासाठी फेसबुक मैदानात उतरलं आहे. 

मोफत असेल फेसबुक डेटींग, डेस्कटॉप यूजर्सन नाही होणार फायदा

सध्या फेसबुक डेटींग अॅपची टेस्टिंग कोलंबियामध्ये सुरु आहे. १८ वर्ष वय असलेले तरुण या सेवेचा फायदा घेऊ शकतील. पण या सेवेचा फायदा डेस्कटॉप यूजर्सना होणार नाहीये. सध्या ही सेवा मोफत आणि फेसबुकसोबतच उपलब्ध केली आहे. 

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फेसबुकचे प्रॉडक्ट मॅनेजप नाथन शार्प म्हणाले  की, 'डेटींग एक अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून आम्ही फेसबुकवर होताना पाहिली आहे. आता आम्ही केवळ याला सोपे केले आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोक याचा भाग होऊ शकतील'.

वेगळं असेल डेटींग प्रोफाईल

डेटींगचं हे फीचर पूर्णपणे पर्यायी आहे. प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी फेसबुक एका व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाईलचा वापर केवळ व्यक्तीचं नाव आणि वय जाणून घेण्यासाठीच करतील. याने तुमच्याशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीला तुम्ही डेटींग करत आहाता हे कळणार नाही. 

तुम्हाला ही सेवा घेण्यासाठी एक वेगळं डेटींग प्रोफाईल तयार करण्यास सांगितले जाईल. त्यात तुम्हाला तुमच्याबाबत माहिती द्यावी लागेल. एक प्रोफाईल फोटो, खाजगी माहिती सोबतच काही खाजगी प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतील. हे प्रोफाईल फेसबुक प्रोफाईलपेक्षा वेगळं असेल. 

टिंडर आणि बम्बलपेक्षा वेगळं कसं फेसबुक डेटींग अॅप

१) फेसबुकचं हे अॅप टिंडर आणि बम्बलपेक्षा फार वेगळं आहे. यात फेसबुक यूजर्सना त्यांच्या पसंतीनुसार मॅच उपलब्ध करुन दिले जातील. ते आपल्या हिशोबाने स्क्रोल करुन आपल्या आवडीच्या प्रोफाईलवर जाऊन माहिती बघू शकतात आणि पार्टनर निवडू शकतात. 

२) टिंडरमध्ये यूजर्सना स्वाईप करावं लागतं. तेच फेसबुकमध्ये तुम्ही पार्टनर निवडण्याआधी त्याच्याशी चॅट करु शकता. टिंडरमध्ये असे नाहीये.

Web Title: Facebook's new Dating service is ready to take on Tinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.