फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:39 PM2019-04-19T12:39:47+5:302019-04-19T12:50:02+5:30

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर पुन्हा एकदा फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत. 

facebook uploaded email contacts of almost 15 lakh user | फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड

फेसबुकचा पुन्हा 'घोळ'; 15 लाख युजर्सचे ई मेल कॉन्टॅक्ट्स केले अपलोड

ठळक मुद्देफेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत. मे 2016 पासून आतापर्यंत 'अजाणतेपणी' 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाल्याची माहिती फेसबुकनेच दिली आहे. हे कॉन्टॅक्ट कोणाशीही शेअर करण्यात आलेले नाहीत. आता ते डिलीट करण्याचं काम सुरू आहे.

नवी दिल्ली - फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच आता कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत. 

मे 2016 पासून आतापर्यंत 'अजाणतेपणी' 15 लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाल्याची माहिती फेसबुकनेच दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'फेसबुकने मार्चमध्ये पहिल्यांदा साइन-अप करणाऱ्या युजर्सना ई-मेल पासवर्ड व्हेरिफिकेशन ऑप्शन ऑफर बंद केली होती. अशा काही प्रकरणांत युजर्सने अकाउंट तयार केल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकवर अपलोड झाले होते.' तसेच जवळपास 15 लाख युजर्सचे ईमेल कॉन्टॅक्ट अपलोड झाल्याची माहिती फेसबुकने रॉयटर्सला दिली आहे. हे कॉन्टॅक्ट कोणाशीही शेअर करण्यात आलेले नाहीत. आता ते डिलीट करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती फेसबुकने दिली आहे. ज्या युजर्सचे कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत त्यांना कंपनीकडून नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. ही समस्या आता सोडवण्यात आली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 

सावधान! फेसबुकवर रोज 10 लाख अकाऊंट होताहेत ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या समर्थकांचा सोशल मीडियावरील वावर अधिक वाढला आहे. खोटी अकाऊंट्स आणि पेजेसचा वापर करून एकमेकांविरोधात फेक न्यूज आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुककडून कारवाई करण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक दिवसाला 10 लाख अकाऊंट ब्लॉक करत आहे. आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या मदतीने फेसबुक एका दिवसात 10 लाख फेक अकाऊंटवर कारवाई करत आहे. याआधी गेल्या आठवड्यात फेसबुकने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवळपास 700 पेज, ग्रुप आणि अकाऊंटवर कारवाई केली होती. 

Facebook ने चुकून मार्क झुकेरबर्गच्याच पोस्ट केल्या डिलीट 

काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गच्या काही जुन्या पोस्ट डिलीट झाल्याची माहिती समोर आली होती. फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये टीमकडून चुकून डिलीट झाल्याचे स्पष्ट केले होते. फेसबुकडून आता मार्क झुकेरबर्ग याच्या 2007 आणि 2008 या दोन वर्षांतील काही पोस्ट डिलीट झाल्या आहेत. त्यामुळे झुकेरबर्ग याचे अकाऊंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य युजर्सचं काय, असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. दरम्यान या सर्व पोस्ट चुकून डिलीट झाल्या असून त्या कंपनीच्या ब्लॉग किंवा न्युजरूममध्ये मिळू शकतील अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली होती.

कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक

फेसबुकच्या कोट्यवधी युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हरवर लीक झाला आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. सायबर स्पेस कंपनी अपगार्डच्या वृत्तानुसार, फेसबुकसाठी काम करणाऱ्या अन्य दोन कंपन्यांनी (थर्ड पार्टी) युजरचा डेटा अ‍ॅमेझॉनच्या सर्व्हरवर स्टोर केला आहे. तो डेटा सहजपणे इतरांना डाउनलोड करता येऊ शकतो. त्यातील एका कंपनीने 146 गीगाबाइट डेटा गोळा केला आहे. त्यात 540 मिनियन म्हणजेच 54 कोटी युजर्सच्या लाइक्स, कॉमेंट आणि अकाऊंटचा समावेश आहे. किती युजर्सच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे याबाबत नेमकी आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. तर दुसऱ्या अ‍ॅपने 22 हजार फेसबुक युजरचे 'अनप्रोटेक्टेड' पासवर्ड स्टोर केले आहेत. 

Facebook अकाऊंट दुसरं कोणी लॉग इन करेल याची भीती वाटते?; 'हे' फीचर करणार अलर्ट

फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक काही वेळा चुकून लॉग इन राहीलं तर अनेकदा त्याचा चुकाचा वापर केला जाण्याची शक्यता ही अधिक असते. मात्र फेसबुकमध्ये एक असं फीचर आहे ज्याच्या मदतीने युजर्स अकाऊंट सुरक्षित ठेवू शकतात. Facebook च्या सेटिंग में Extra Security देण्यासाठी युजर्सना एक फीचर देण्यात आले आहे.

- फेसबुकने दिलेले हे फीचर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपलं फेसबुक अकाउंट ओपन करा. 

- ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास एक नवं पेज ओपन होईल. 

- मल्टीपल ऑप्शन त्यामध्ये देण्यात आलेले असतील. त्यातील  Security & Login वर जा.

- थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर ‘Setting Up Extra Security’ चा एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

-  ‘Get Alerts about unrecognized logins’ हा पर्याय दिसेल. तसेच त्याच्यासमोर Edit चे बटण असणार आहे. 

- पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे ‘Notification’, ‘Messenger’ आणि ‘Email’ हे तीन पर्याय दिसतील. 

- तिन्ही पर्यायासमोर ‘Get Notifiation’ आणि ‘Don’t Get Notifiation’ असे आणखी दोन पर्याय दिसतील.  

- यामध्ये युजर्सना  ‘Get Notifiation’ वर टिक करून Enable करावं लागेल. त्यानंतर Save Changes वर क्लिक करा.

फेसबुक संदर्भातील ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने तुमचं फेसबुक अकाऊंट लॉग इन केलं तर तुम्हाला त्याबाबत अलर्ट दिला जाईल.  

Web Title: facebook uploaded email contacts of almost 15 lakh user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.