फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप

By शेखर पाटील | Published: January 9, 2018 01:13 PM2018-01-09T13:13:48+5:302018-01-09T13:14:14+5:30

फेसबुकने आपला 'एम' हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट बंद करण्याची घोषणा केली असून लवकरच याचे कार्यान्वयन पूर्णपणे थांबणार आहे.

Facebook to shut down its virtual assistant | फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप

फेसबुकचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट घेणार निरोप

Next

व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चुरस सुरू झाली आहे. गुगलचा गुगल असिस्टंट, अमेझॉनचा अलेक्झा, अ‍ॅपलचा सिरी, मायक्रोसॉफ्टचा कोर्टना, सॅमसंगची बिक्सबी आदी डिजीटल असिस्टंटचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकनेही आपल्या मॅसेंजरच्या युजर्ससाठी एम या नावाने व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्याची ऑगस्ट २०१५ मध्ये घोषणा केली होती. यामुळे या क्षेत्रात फेसबुक अन्य कंपन्यांशी टक्कर घेणार असल्याचे मानले जात होते. दरम्यान, काही डेव्हलपर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेण्यात आली. तर एप्रिल २०१७ पासून जगभरातील युजर्सला 'एम' हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला होता. 

एमम हा व्हर्च्युअल असिस्टंट आर्टीफिशियल इंटिलेजियन्स अर्थात कृत्रिम बुध्दीमत्तेसह मानवी सहाय्यकांनी सज्ज आहे. मॅसेंजरचा युजर हा समोरच्या व्यक्तीशी चॅटींग करत असतांना शब्द सुचविण्यासह तो किरकोळ स्वरूपाची कामे करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ कुणी चित्रपटाबाबत चर्चा करत असल्यास तो जवळच्या सिनेमागृहातील चित्रपटाच्या 'शो'ची माहिती देत त्याची तिकिटे खरेदी करण्याचे सुचवतो. याशिवाय तो एकमेकांना त्यांचे अचूक लोकेशनही शेअर करण्यास सक्षम आहे. मात्र हा डिजीटल असिस्टंट फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सला फारसा भावला नाही. खरं तर, बहुतांश युजर्सला या प्रकारचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट असल्याची माहितीदेखील कळली नाही. अर्थात युजर्समध्ये हा असिस्टंट फारसा लोकप्रिय झाला नसल्याचे फेसबुकने याला बंद करण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे. १९ जानेवारीपासून 'एम' या व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट काढण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुकतर्फे करण्यात आली आहे. 
 

Web Title: Facebook to shut down its virtual assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.