Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करायचंय? मग 'या' गोष्टी करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:16 PM2019-03-11T16:16:29+5:302019-03-11T16:34:40+5:30

Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करता येणार आहे. मेसेंजर अ‍ॅपमधील एका दमदार फीचरमुळे मित्रमैत्रिणीसोबतचे चॅट आता सिक्रेट ठेवता येणार आहे.

facebook messenger how to do secret chat on messenger here are the steps | Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करायचंय? मग 'या' गोष्टी करा फॉलो

Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करायचंय? मग 'या' गोष्टी करा फॉलो

googlenewsNext
ठळक मुद्देFacebook Messenger वर सिक्रेट चॅट करता येणार आहे. मेसेंजर अ‍ॅपमधील एका दमदार फीचरमुळे मित्रमैत्रिणीसोबतचे चॅट आता सिक्रेट ठेवता येणार आहे.End to End Encrypted असं या फीचरचं नाव आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र अनेकदा फेसबुकवर चॅट करताना येणारे मेसेज हे फेसबुक अकाऊंट सुरू राहील्यास इतरांना दिसतात. मात्र आता Facebook Messenger वर सिक्रेट चॅट करता येणार आहे. मेसेंजर अ‍ॅपमधील एका दमदार फीचरमुळे मित्रमैत्रिणीसोबतचे चॅट आता सिक्रेट ठेवता येणार आहे. End to End Encrypted असं या फीचरचं नाव असून हे फीचर तुमचं चॅट सुरक्षित ठेवते. फेसबुकचे सीईओ Mark Zuckerberg सुद्धा युजर्सचं सिक्रेट चॅट वाचू शकत नाही. 

फेसबुक मेसेंजरवर असं करा सिक्रेट चॅट

- सिक्रेट चॅट करायचे असल्यास सर्वप्रथम Facebook Messenger ओपन करा.

- ज्या व्यक्तीसोबत सिक्रेट चॅट करायचे आहे त्या व्यक्तीच्या मेसेंजर प्रोफाईलवर जा. 

- युजरच्या प्रोफाईलवर एक Timer आयकॉन दिसेल. त्यावर आयकॉनवर टॅप करा. Go to Secret Conversation वर क्लिक करून ते सुरू करा. 

- Encrypted End to End across all your Active Mobile Devices असं तुम्ही ज्या व्यक्तीसोबत सिक्रेट चॅट करू इच्छिता त्या प्रोफाईलवर दिसेल. 

- सिक्रेट चॅट ओपन करून ते युजर्स ते डिलीट देखील करू शकतात. 

फेसबुकने आणलं भन्नाट फीचर! Send केलेले मेसेज करता येणार Unsend

फेसबुकने एक नवं फीचर आणलं आहे. या भन्नाट फीचरच्या माध्यमातून Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत. Gmail मध्ये ज्याप्रमाणे पाठवलेले मेल अनसेंड करण्याचा पर्याय असतो. त्याचप्रमाणे आता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाठवलेले मेसेज अनसेंड करता येणार आहेत.

फेसबुकचे युजर्स पाठवलेला मेसेज अनसेंड अथवा डिलीट करू शकतात. मात्र सध्या युजर्स फक्त त्यांच्या बाजूने मेसेज डिलीट करु शकतात. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या मित्रांच्या इनबॉक्समध्ये जाऊन देखील पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतात. पण युजर्सना हे केवळ 10 सेकंदाच्या आत करायचे आहे. अमेरिकन वेबसाईट The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे फीचर केवळ iOS प्रणालीसाठी मेसेंजरच्या लेटेस्ट अपडेटसोबत जोडण्यात आले आहे.  

फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम असून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकवरही लवकरच व्हॉट्सअ‍ॅपसारखं लोकप्रिय फीचर येणार आहे.  व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर काम करत अगदी तशाच पद्धतीने आता फेसबुकवरचे युजर्स मेसेज डिलीट करू शकणार आहेत. मेसेज डिलीट करण्यासाठी युजर्सकडे जवळपास 10 मिनिटांचा वेळ असणार आहे. यासाठी मेसेंजरमध्ये अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. हे नवं फिचर आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइडमधील काही व्हर्जनमध्ये सुरू झाले आहे. लवकरच सर्व मेसेंजरमध्ये हे फीचर उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.
 

Web Title: facebook messenger how to do secret chat on messenger here are the steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.