फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:12 PM2019-02-06T17:12:19+5:302019-02-06T17:27:13+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

facebook messenger get whatsapp like delete for everyone feature | फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

फेसबुकवर लवकरच येणार WhatsApp सारखं 'हे' फीचर

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर काम करत अगदी तशाच पद्धतीने आता फेसबुकवरचे युजर्स मेसेज डिलीट करू शकणार आहेत.मेसेज डिलीट करण्यासाठी युजर्सकडे जवळपास 10 मिनिटांचा वेळ असणार आहे.लवकरच सर्व मेसेंजरमध्ये हे फीचर उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम असून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. फेसबुकवरही लवकरच व्हॉट्सअ‍ॅपसारखं लोकप्रिय फीचर येणार आहे.  व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे एखादा मेसेज केला आणि तो काही कारणास्तव डिलीट करायचा असेल तर डिलीट फॉर एव्हरीवन करण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरही आता पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्याप्रमाणे डिलीट फॉर एव्हरीवन हे फीचर काम करत अगदी तशाच पद्धतीने आता फेसबुकवरचे युजर्स मेसेज डिलीट करू शकणार आहेत. मेसेज डिलीट करण्यासाठी युजर्सकडे जवळपास 10 मिनिटांचा वेळ असणार आहे. यासाठी मेसेंजरमध्ये अनसेंड असे एक बटण देण्यात येणार आहे. हे नवं फिचर आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइडमधील काही व्हर्जनमध्ये सुरू झाले आहे. लवकरच सर्व मेसेंजरमध्ये हे फीचर उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुक मेसेंजरवर असा करा मेसेज डिलीट 

- युजर्सने सर्वप्रथम जो मेसेज डिलीट करायचा आहे तो सिलेक्ट करावा.

- सिलेक्ट केल्यानंतर युजर्सना दोन पर्याय देण्यात येतील.

- एक 'Remove for everyone' तर दुसरा 'Remove for You' पर्याय देण्यात आला आहे. 

- 'Remove for everyone' या पर्यायावर क्लिक केले असता तो मेसेज डिलीट केला जाणार आहे. 

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फिचर आणत असते. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. फेसबुकने ही सुविधा कधी सुरू करणार हे अद्याप सांगितले नसले तरीही 2019 च्या शेवटी किंवा 2020 च्या सुरुवातीला सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.
 

Web Title: facebook messenger get whatsapp like delete for everyone feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.