Facebook, Insta Block accounts on Elections days | निवडणुकांच्या तोंडावर शंभरावर फेसबुक, इन्स्टावरील अकाऊंट ब्लॉक
निवडणुकांच्या तोंडावर शंभरावर फेसबुक, इन्स्टावरील अकाऊंट ब्लॉक

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले असून दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप असणाऱ्या फेसबुकने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी आक्षेपार्ह वाटणारी 115 खाती फेसबुकने ब्लॉक केली आहेत. 


अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सोशल प्रचारावेळी गैरवापर झाल्याचा आरोप फेसबुकवर ठेवण्यात आले होते. यावर सुनावणीही सुरु आहे. त्यातच नुकतेच 9 लाखांवर खाती हॅक झाली होती. भारतातही येत्या काळात निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे अमेरिकेसह भारतातील सरकारांना आश्वस्त करण्यासाठी फेसबुकने पहिले पाऊल उचलले आहे. 
फेसबुकन आज फेसबुकवरील 30 आणि इन्स्टाग्रामवरील 85 खाती ब्लॉक केली आहेत. ही खाती परदेशातील काहीं जणांशी संबंधीत असल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. 
 


Web Title: Facebook, Insta Block accounts on Elections days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.