ईअरफोन आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:46 AM2017-12-28T02:46:56+5:302017-12-28T02:47:10+5:30

विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे; पण प्रगतीबरोबर अधोगतही पावलावर पाऊल ठेवून सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Earphone health hazard | ईअरफोन आरोग्यास घातक

ईअरफोन आरोग्यास घातक

googlenewsNext

रीना चव्हाण
विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे; पण प्रगतीबरोबर अधोगतही पावलावर पाऊल ठेवून सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साधे मोबाइलचे उदाहरण घ्या. आज मोबाइल जगण्यासाठी जणू आवश्यक गोष्ट झालाय. एक वेळ जेवण नसेल तरी चालेल; पण हातात मोबाइल हवा. आपल्या आजूबाजूला नजर फिरवल्यास हातात मोबाइल आणि कानात ईअरफोन घातल्याशिवाय कोणाचे पानच हलत नाही. आजकाल तरुणाईमध्ये कानात ईअरफोन घालणे, हे एक फॅडच झाले आहे; पण सतत कानात हेडफोन वा ईअरफोन घातल्याने ऐकण्याबाबत समस्या भेडसावू शकते. एका संशोधनानुसार, जर एखादी व्यक्ती कानात ईअरफोन घालून दरदिवशी एका तासापेक्षा जास्त वेळ ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात गाणी ऐकत असेल तर त्याला कायमस्वरूपी बहिरेपणाही येऊ शकतो. त्यामुळे ईअरफोन घालून मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या सवयीला वेळीच मुरड घाला. ईअरफोनच्या दुष्परिणामांबाबत जाणून घेऊ या...
>ऐकू कमी येणे
कानात सतत ईअरफोन घालून मोठमोठ्याने गाणी ऐकल्याने ऐकण्याची क्षमता ४० ते ५० डेसिबलपर्यंत कमी होऊ शकते. मोठ्या आवाजाच्या सततच्या आघातामुळे कानाच्या पडद्याला त्रास होतो. त्यामुळे ठरावीक काळानंतर दूरचे ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. बहिरेपणही येऊ शकते. संगीताचा आनंद घ्या; पण त्यासाठी मोठाच आवाज कशासाठी? तसेच गाणे ऐकताना मध्येमध्ये ब्रेक घ्या.
>कोणत्याही गोष्टीचा आंनद घ्या; पण त्याचा अतिरेक टाळा. ईअरफोनचा वापर कमीत कमी करण्याची सवय अंगी बाळगा. स्वस्तात हेडफोन मिळतात म्हणून घेऊ नका, चांगल्या क्वालिटीच्या ईअरफोन वा हेडफोनचाच वापर करा.
>डोक्यावर घातक परिणाम
ईअरफोनमधून निघणारे विद्युत चुंबक लहरी डोक्यातील पेशींवर परिणाम करतात. त्यामुळे कान दुखणे, डोके दुखणे, झोप न येणे, अशा समस्यांना समोरे जावे लागते. आजकाल डोळ्यांची जळजवळ, कमी ऐकू येणे, या समस्यांनी तरुणाई ग्रस्त आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाइल आणि ईअरफोन. कारण समोरासमोर बोलायला कोणाला वेळ नसतो. मात्र, कानात ईअरफोन टाकून तासन्तास गप्पा मारल्या जातात. मैदानी खेळ सोडून आजकाल लहान मुलेसुद्धा मोबाइलवर गेम खेळताना दिसतात. सतत मोबाइलवर बघत राहिल्याने डोळ्यांनाही आणि ईअरफोनमुळे कानालाही त्रास होतो.
>इन्फेक्शन
ईअरफोन तासन्तास कानात घालून मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कानाला इन्फेक्शन होते. तसेच सतत कानाच्या पडद्यावर मोठ्या आवाजाचा मारा झाल्यास कान सुन्न होऊन ऐकण्याची क्षमता कमी होते. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने मानसिक समस्यांना सामोरे जावेच लागते. तसेच हार्टअटॅक, कॅन्सर यासारख्या समस्यासुद्धा उद्भवतात. तसेच दुसरºयाचा ईअरफोन घातल्यास लगेच कानात घालू नका. सेनिटायझरच्या साहाय्याने पहिल्यांदा ते स्वच्छ करून घ्या.

Web Title: Earphone health hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.