ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 01:34 PM2018-09-13T13:34:42+5:302018-09-13T13:36:40+5:30

व्हाट्सअॅपवर एखाद्याला मेसेज पाठवल्यास तो त्याने वाचला की नाही याबाबत दोन निळ्या रंगात टीक दिसतात. यामुळे पाठवणाऱ्याला हा मेसेज वाचल्याचे समजते.

E-mails also had read receipts; Gmail's new feature | ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा

ई-मेलही वाचल्याचे समजणार; जीमेलची नवी सुविधा

Next

मुंबई : व्हाट्सअॅपवर एखाद्याला मेसेज पाठवल्यास तो त्याने वाचला की नाही याबाबत दोन निळ्या रंगात टीक दिसतात. यामुळे पाठवणाऱ्याला हा मेसेज वाचल्याचे समजते. आता गुगलनेही आपल्या जीमेलसाठी ही सोय आणली आहे. मात्र, त्यासाठी गुगल क्रोममध्ये काही बदल करावे लागणार आहेत. 


बऱ्याचदा कामकाजावेळी एखादा मेल पाठविल्यानंतर समोरच्याला पाठविणाऱ्याला टाळायचे असेल तर त्याला मेल पाहिला नसल्याचे सांगण्यात येते. तसेच बऱ्याचदा समोरच्याला फोन करून मेल मिळाला की नाही, याबाबत विचारावे लागते. तर काहीवेळा ई-मेल उशिराने पोहोचतात. यामुळे त्रास सहन करावा लागतो. गुगलने आपल्या वापरकर्त्यांना यातून दिलासा दिला आहे. ही प्रणाली व्हॉट्सअॅप सारखीच काम करणार आहे. 


गुगल क्रोममध्ये एक एक्सटेंशन टाकावे लागणार आहे. या एक्सटेंशनला ब्राऊजरशी जोडल्यानंतर पाठविलेला मेल समोरच्याला पोहोचल्यास एक निळी खून आणि त्याने वाचल्यास दोन निळ्या टीक दिसणार आहेत. 


गुगल क्रोममध्ये हे एक्सटेंशन अॅड करण्यासाठी खालील कृती पाहा...

  1. सर्वात आधी गुगल क्रोम हा ब्राऊजर सुरु करा.
  2. गुगलवर Mailtrack नावाने शोधा. यानंतर एक्सटेंशनचे पेज सुरु करा किंवा यासाठी या लिंकवर क्लिक करा.  (https://chrome.google.com/webstore/detail/email-tracking-for-gmail/ndnaehgpjlnokgebbaldlmgkapkpjkkb?hl=en) 
  3. पेज ओपन झाल्यावर उजवीकडे सर्वात वर दिलेले अॅड टू क्रोम हे बटन क्लिक करा.
  4. यावर क्लिक केल्यानंतर क्रोम तुमच्याकडे परवानगी मागेल. त्याला परवानगी देऊन Add extension वर क्लिक करावे.
  5. क्लिक केल्यानंतर मेलट्रॅक हे एक्सटेंशन क्रोमवर अॅड होईल. तसेच नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये मेलट्रॅक गुगलशी जोडण्य़ासाठी परवानगी मागेल. ती देण्य़ासाठी कनेक्ट विथ गुगलवर क्लिक करा.
  6. हे केल्यानंतर गुगल अकाउंट लॉगईन करण्यास सांगेल. लॉगईन केल्यानंतर नवीन पेज उघडेल. यानंतर मेलट्रॅक खरेदी करण्याचा पर्याय दिसेल. खरेदी करायचे नसल्यास डाव्या बाजुला साईन अप फ्री असा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. 
  7. ही सुविधा अँड्रॉईडवरही उपलब्ध होईल. अँड्रॉईडवर मेलट्रॅक घ्यायचे असेल तर पुढील पेज ओपन झाल्यावर इन्स्टॉल अॅड-ऑन फॉर अँड्रॉईडवर क्लिक करा. 
  8. गो टू जीमेलवर क्लिक केल्यानंतर जीमेल अकाऊंट सुरु होईल. यानंतर पाठविलेल्या मेलवर मेलट्रॅकची सुविधा मिळेल.
  9. या टीकवर माऊसचा अॅरो नेल्यानंतर पॉपअपमध्ये हा मेल किती वेळापूर्वी वाचला गेला हेही समजणार आहे.

Web Title: E-mails also had read receipts; Gmail's new feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.