डेलचे इन्स्पीरॉन १५ नोटबुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 04:28 PM2018-04-26T16:28:41+5:302018-04-26T16:28:50+5:30

लॅपटॉपमध्ये उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

Dell's Inspiron 15 Notebook | डेलचे इन्स्पीरॉन १५ नोटबुक

डेलचे इन्स्पीरॉन १५ नोटबुक

googlenewsNext

डेल कंपनीने एएमडी रायझेन प्रोसेसरने सज्ज असणारे डेल इन्स्पीरॉन १५ (५५७५) हे नोटबुक भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

डेलने इन्स्पीरॉन १५ या मालिकेत आधीही लॅपटॉप लाँच केले आहेत. यात इंटेलच्या कोअर या मालिकेतील प्रोसेसर देण्यात आले होते. आता मात्र इन्स्पीरॉन १५ (५५७५) या मालिकेत एएमडी रायझेन या अद्ययावत प्रोसेसर्सने युक्त असणारे नोटबुक भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहेत. याला एमएडीच्याच राडीऑन आरएक्स वेगा या ग्राफीक प्रोसेसरची जोड देण्यात आली आहे. यातील आर ३ हे मॉडेल ३८,९९० तर आर५ हे मॉडेल ४९,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. यातील पहिल्या मॉडेलमध्ये ३ जीबी रॅम व दुसर्‍या मॉडेलमध्ये ४ जीबी रॅम असून १ टेराबाईटपर्यंत स्टोअरेजचे पर्याय आहेत. रेकॉन ब्ल्यू, प्लॅटीनम सिल्व्हर आणि स्पार्कलींग व्हाईट या तीन आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल देशभरातील डेल कंपनीच्या शोरूम्ससह अन्य शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

डेल इन्स्पीरॉन १५ या मालिकेत १५ इंच आकारमानाचा आणि एचडी तसेच फुल एचडी क्षमतांचे अँटी ग्लेअर तंत्रज्ञानाने युक्त असणारे डिस्प्ले देण्यात आले आहेत. याला मॅक्स कंपनीच्या ऑडिओ प्रो या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. याच्या मदतीने युजरला अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ७ तास २६ मिनिटांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यामध्ये सपोर्ट असिस्ट हे खास टुल देण्यात आले आहेत. याच्या मदतीने विंडोज प्रणालीतील कोणताही दोष तातडीने समजू शकणार आहे.  तसेच यात स्मार्ट बाईट हे कनेक्शन ऑप्टीमायझर टुलदेखील देण्यात आले आहे. हे नोटबुक विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहे. यामध्ये एचडी क्षमतेचा वेबकॅम आणि अतिशय दर्जेदार असा मायक्रोफोन देण्यात आला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायसह युएसबी २.०, युएसबी ३.१, एचडीएमआय, कार्ड रीडर आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Dell's Inspiron 15 Notebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.