'डेटा त्सुनामी'; ही कंपनी देतेय 98 रूपयात 39 जीबी डाटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 11:02 AM2018-05-20T11:02:03+5:302018-05-20T11:02:03+5:30

जिओला टक्कार देण्यासाठी 'डाटा सुनामी' या नावाने नवीन प्लॅन सादर केला आहे.

'Data tsunami'; The company giving 98 rupees 39 GB data | 'डेटा त्सुनामी'; ही कंपनी देतेय 98 रूपयात 39 जीबी डाटा 

'डेटा त्सुनामी'; ही कंपनी देतेय 98 रूपयात 39 जीबी डाटा 

Next

नवी दिल्ली - जिओला टक्कार देण्यासाठी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी 'डाटा सुनामी' या नावाने नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 98 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 39 जीबी फोर-जी डाटा मिळणार असून याची वैधता 26 दिवसांची आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन अतिशय किफायतशीर आहे. तथापि, बीएसएनएलचा हा फक्त डाटा प्लॅन असल्याची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे यात ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे कॉल अथवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही.  बीएसएनएलच्या सर्व सर्कलला हा प्लॅन लागू  होणार आहे. 

याआधी बीएसएनएलने 118 रुपयांचा रिचार्ज प्लान आणला होता. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी रोज एक जीबी डेटा मिळत आहे. त्याचप्रमाणे 149 रुपयांच्या जियो ऑफरमध्ये 28 दिवसांसाठी रोज 1.5 जीबी डेटा मिळतोय. त्याहिशोबाने एक जीबी डेटाची किंमत 3.5 रुपये पडते. तर एअरटेलदेखील 149  रुपयांची ऑफर देतेय. ज्यामध्ये 5.3रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळतो. 

Web Title: 'Data tsunami'; The company giving 98 rupees 39 GB data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.