कल्ट अँबिशन : ३ जीबी रॅमयुक्त किफायतशीर स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: December 5, 2017 01:55 PM2017-12-05T13:55:44+5:302017-12-05T13:57:12+5:30

कल्ट या मोबाईल उत्पादक कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी कल्ट अँबिशन हा ३ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध केला आहे.

Cult ambition: 3 GB RAM with lucrative smartphone | कल्ट अँबिशन : ३ जीबी रॅमयुक्त किफायतशीर स्मार्टफोन

कल्ट अँबिशन : ३ जीबी रॅमयुक्त किफायतशीर स्मार्टफोन

Next

मुंबई - सध्या एंट्री लेव्हल स्मार्टफोनच्या क्षेत्रात प्रचंड चुरस सुरू आहे. यात अनेक मातब्बर कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे अन्य कंपन्यांनाही तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या अनुषंगाने कल्ट या भारतीय कंपनीने कल्ट अँबिशन या नावाने नवीन मॉडेल सादर केले आहे. वर नमूद केल्यानुसार याचे मूल्य ५,९९९ रूपये असेल. ग्राहकांना ११ डिसेंबरपासून हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

कल्ट अँबिशन हा स्मार्टफोन ५ इंच आकारमानाच्या आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेच्या आयपीएस डिस्प्लेने सज्ज आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी६७३५ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने अजून ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. यात तीन कार्ड स्लॉट आहेत. यामुळे ड्युअल सीमकार्डसह यात स्वतंत्र मायक्रो-एसडी कार्डचा वापर करता येईल. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या कॅमेर्‍यात ब्युटी मोड हे फिचर देण्यात आलेले आहे. तसेच याच्या मदतीने हाय डेफिनेशन क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येईल.

कल्ट अँबिशन हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात इंटिलेजियंट पॉवर सेव्हींग आणि स्टँडबाय बॅटरी सेव्हर या तंत्रज्ञानाने युक्त असणारी २६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. यामध्ये फिंरगप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आलेले आहे. तर यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. 
 

Web Title: Cult ambition: 3 GB RAM with lucrative smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल