लवकरच येणार गुगल वेअरओएस

By शेखर पाटील | Published: March 15, 2018 10:43 AM2018-03-15T10:43:33+5:302018-03-15T10:43:33+5:30

गुगलने वेअरओएस ही नवीन ऑपरेटींग सिस्टीम लाँच करण्याची तयारी सुरू केली असून अँड्रॉइड वेअरमध्ये काही प्रमाणात बदल करून याला विकसित करण्यात आले आहे.

Coming soon Google WearOS | लवकरच येणार गुगल वेअरओएस

लवकरच येणार गुगल वेअरओएस

googlenewsNext

गुगलने वेअरओएस ही नवीन ऑपरेटींग सिस्टीम लाँच करण्याची तयारी सुरू केली असून अँड्रॉइड वेअरमध्ये काही प्रमाणात बदल करून याला विकसित करण्यात आले आहे. जगभरात वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. स्मार्टबँड, स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर आदी याचे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे प्रकार आहेत. भविष्यात या क्षेत्रात प्रचंड तेजी येणार असल्यावर बहुतांश तज्ज्ञांचे एकमत आहे. अर्थात या सर्व उपकरणांसाठी ऑपरेटींग सिस्टीमदेखील आवश्यक आहेच. नेमकी हीच बाब लक्षात घेत गुगलने अँड्रॉइड वेअर ही ऑपरेटींग प्रणाली आधीच सादर केली आहे. अनेक उपकरणांमध्ये याला वापरले जात आहे. तथापि, ताज्या वृत्तानुसार अँड्रॉइड वेअर ही प्रणाली काळाच्या पडद्याआड जाणार असून याऐवजी सुधारित वेअरओएस ही ऑपरेटींग सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेडीट या सोशल साईटवरील काही युजर्सला वेअरओएस या नावाची नवीन प्रणाली येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुगलने गेल्याच आठवड्यात आपल्या अँड्रॉइड पी या आगामी आवृत्तीचा प्रिव्ह्यू जगभरातील युजर्ससाठी सादर केला होता. यात वेअरओएसचा आयकॉन्ससह अन्य प्राथमिक माहितीचे स्त्रोत आढळून आले आहेत. यामुळे गुगल लवकरच ही नवीन प्रणाली सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही प्रणाली वेअरेबल्ससाठी वापरण्यात येणार आहे. अर्थात अँड्रॉइड वेअर या विद्यमान प्रणालीत काही बदल करून याला नवीन नावाने सादर करण्यात येणार असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. अ‍ॅपलने स्मार्टवॉचसाठी स्वतंत्र वॉचओएस सादर केली आहे. याला आव्हान देण्यासाठी वेअरओएस ही ऑपरेटींग सिस्टीम अस्तित्वात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मे महिन्याच्या प्रारंभी होणार्‍या गुगलच्या आय/ओ परिषदेत याबाबत घोषणा होऊ शकते.

Web Title: Coming soon Google WearOS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल