क्रोम 62 : काय आहेत नवीन फिचर्स ?

By शेखर पाटील | Published: October 26, 2017 12:02 PM2017-10-26T12:02:55+5:302017-10-26T12:03:51+5:30

गुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरची नवीन आवृत्ती युजर्सला सादर केली असून यात गतीमान डाऊनलोडींगच्या सुविधेसह अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Chrome 62: What are the new features? | क्रोम 62 : काय आहेत नवीन फिचर्स ?

क्रोम 62 : काय आहेत नवीन फिचर्स ?

ठळक मुद्देगुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरची नवीन आवृत्ती युजर्सला सादर केली असून यात गतीमान डाऊनलोडींगच्या सुविधेसह अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.क्रोम 62 ही आवृत्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रयोगात्मक स्थितीत होती. आता ग्लोबल अपडेटच्या माध्यमातून सर्व युजर्सला ही नवीन आवृत्ती सादर करण्यात येत आहे.

गुगलने आपल्या क्रोम ब्राऊजरची नवीन आवृत्ती युजर्सला सादर केली असून यात गतीमान डाऊनलोडींगच्या सुविधेसह अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

क्रोम 62 ही आवृत्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रयोगात्मक स्थितीत होती. आता ग्लोबल अपडेटच्या माध्यमातून सर्व युजर्सला ही नवीन आवृत्ती सादर करण्यात येत आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही ब्राऊजरच्या लोकप्रियतेत गती ही महत्वाची मानली जाते. याचा विचार करता क्रोम 62 या ब्राऊजरवरून वेब पेज लवकर उघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात अ‍ॅक्सलरेटेड डाऊनलोड हे विशेष फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने आधीपेक्षा अत्यंत गतीमान पध्दतीने डाऊनलोड करता येणार आहे. अर्थात क्रोम ब्राऊजरवर आता विविध प्रकारच्या फाईल्स गतीमान पध्दतीने डाऊनलोड होतील. याशिवाय यात नेटवर्क क्वालिटी इंडिकेटर प्रदान करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत नेटवर्क इन्फॉर्मेशन एपीआयचा विस्तार करण्यात आला आहे. याचा युजरला खूप लाभ होणार आहे. 

उदाहरणार्थ कुणी युजरला आपण वाय-फायला कनेक्ट असल्याचे वाटत असेल, आणि प्रत्यक्षात तो त्याच्या स्मार्टफोनमधील हॉटस्पॉटच्या माध्यमातून कमी वेग असणार्‍या इंटरनेटला जोडलेला असेल तर याची माहिती त्या युजरला मिळणार आहे.

क्रोम 62 या ब्राऊजरमध्ये ओपन टाईप व्हेरियेबल फाँटस् वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एकाच फाँटच्या आकारमानाचा एकापेक्षा जास्त फाँट वापरल्यामुळे वेब पेजवर पडणारा भार कमी होणार आहे. या नवीन आवृत्तीत एचटीटीटीएस या मानकानुसार सुरक्षित नसणारे संकेतस्थळ उघडल्यास संबंधीत युजरला ते सुरक्षित नसण्याची शक्यता असण्याचे अलर्ट मिळणार आहे. तर यात डेव्हलपर्ससाठी काही नवीन फिचर्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यात पेमेंट रिक्वेस्ट एपीआय, वेब व्हिआर ट्रायल आदींचा समावेश आहे. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज प्रणालीच्या युजर्ससाठी क्रोम ६२ ही आवृत्ती सादर करण्यात आली आहे.
 

Web Title: Chrome 62: What are the new features?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.