सर्वात स्वस्त ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: November 3, 2017 08:38 AM2017-11-03T08:38:29+5:302017-11-03T08:38:46+5:30

आयटेल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला आयटेल एस२१ हा स्मार्टफोन लाँच केला असून याची खासियत म्हणजे हा आजवरचा सर्वात स्वस्त मूल्य असणारा ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन आहे.

The cheapest dual selfie camera with smartphones | सर्वात स्वस्त ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन

सर्वात स्वस्त ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन

Next

अलीकडच्या काळात ड्युअल कॅमेरा सेटअप हे फिचर बहुतांश फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये असल्याचे दिसून येत आहे. काही मिड रेंज मॉडेल्समध्येही ही सुविधा आहे. तथापि, सेल्फीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअपची व्यवस्था मोजक्या मॉडेलमध्ये असून ते मिडरेंज या प्रकारातील आहेत. या पार्श्‍वभूमिवर आयटेल एस२१ हा स्मार्टफोन ड्युअल फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज आहे. विशेष म्हणजे याचे मूल्य अवघे ५,९९९ रूपये आहे. याच्या पुढील बाजूस एलईडी फ्लॅशसह ५ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल.

या दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत परिणामातून अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी काढता येत असल्याचे आयटेलतर्फे नमूद करण्यात आले आहे. यातील एका कॅमेर्‍यात १२० अंशाचा व्ह्यू देण्यात आला असून याच्या मदतीने अतिशय उत्तम ग्रुप सेल्फी घेता येतात. यासाठी सेल्फी आणि ग्रुप सेल्फी असे दोन स्वतंत्र मोड देण्यात आले आहेत. तर याच्या मागील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या फिचर्सने सज्ज असणारा ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. आयटेल एस२१ या मॉडेलमध्ये फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसाठी ड्युअल अकाऊंटचा सपोर्ट आहे. अर्थात या स्मार्टफोनमध्ये या सर्व सोशल अ‍ॅप्सचे एकाच वेळी दोन अकाऊंट वापरता येतील. 

उर्वरित फिचर्सचा विचार करता. आयटेल एस२१ हा स्मार्टफोन ५ इंच आकारमानाच्या आणि एफडब्ल्यूव्हिजीए (८५४ बाय ४८० पिक्सल्स) क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात ड्युअल सीमकार्डसह फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा असेल. यात २,७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा फोर-जी नेटवर्कवरील बॅकअप मिळत असल्याचा आयटेल कंपनीचा दावा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. आयटेल एस२१ हा स्मार्टफोन शँपेन गोल्ड आणि एलिगंट ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

Web Title: The cheapest dual selfie camera with smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.