399 किंवा जास्तीच्या रिचार्जवर 2,599 रूपयांपर्यंत कॅशबॅक, जिओची नवी ऑफर

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 4:53pm

रिलायन्स जिओने पुन्हा एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना तब्बल 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे.  

मुंबई: रिलायन्स जिओने आपल्या प्राइम कस्टमर्ससाठी नव्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या प्रत्येक रिचार्जवर ग्राहकांना 2 हजार 599 रूपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर असणार आहे.  रिलायन्स जिओकडून 399 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या रिचार्जवर 400 रूपयांचं कॅशबॅक व्हाउचर दिलं जाईल. जिओ कॅशबॅक व्हाउचर म्हणजे 50 रूपयांचे 8 टोकन असणार आहेत. हे टोकन मायजिओ या अॅपवर 15 नोव्हेंबरपासून रिडीम करता येतील. याशिवाय रिलायन्स जिओने डिजीटल वॉलेटसह भागीदारी केली आहे. त्यामुळे प्रत्येक रिचार्जवर 300 रूपयांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देण्यात येणार आहे. कॅशबॅक ऑफरसाठी जिओने अग्रगण्य ई-कॉमर्स कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. यानुसार रिचार्जवर 1899 रूपयांचं कॅशबॅक व्हाउचर दिलं जाईल. यामध्ये अॅमेझॉन पे, पेटीएम, मोबिक्विक, फोन पे, एक्सिस पे आणि फ्रीचार्ज आदींचा समावेश आहे.  ग्राहक रिलायन्स जिओ स्पेशल व्हाउचरद्वारे  yatra.com , ajio.com आणि रिलायन्स ट्रेंडवर व्हाउचर रिडीम करू शकतात. जिओ प्राइम ग्राहकांना  yatra.com द्वारे बूक केलेल्या डोमेस्टिक विमान प्रवासासाठी 1000 रूपयांची सूट मिळेल. पण एका बाजूच्या प्रवासासाठी केवळ 500 रूपयांची सूट मिळणार आहे.  रिलायन्स ट्रेन्ड्सद्वारे खरेदी केल्यास प्राइम ग्राहकाला 1 हजार 999 रूपयांच्या खरेदीवर 500 रूपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. AJIO च्या वेबसाइटवर शॉपिंग केल्यास 15 रूपयांच्या खरेदीवर 399 रूपयांचं AJIO व्हाउचर मिळणार आहे. या सर्व ऑफर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत.  

संबंधित

'जियो जी भरके', प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत
31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?
रिलायन कंपनीकडून १२ लाखांची भरपाई
मुकेश अंबानींना 'जिओ'ची भन्नाट आयडिया कुणी सुचवली माहित्येय?
रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री 

तंत्रज्ञान कडून आणखी

पॅनासोनिकचा किफायतशीर स्मार्टफोन
एसरच्या नोटबुकची नवीन मालिका
व्हॉट्सअॅपमध्ये 'ही' सेटिंग केल्याने फेसबुकबरोबर तुमचा डेटा होणार नाही शेअर
ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन
मोटो जी ५ एस स्मार्टफोनची किंमत घसरली

आणखी वाचा