सावधान...! सोशल मिडियावर मित्रांकडूनही तुम्हाला धोका...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:43 PM2019-01-22T17:43:33+5:302019-01-22T17:52:25+5:30

तुमचा खासगीपणा सोशल मिडियासाठी सेकंड हँड स्मोक सारखा आहे.

Beware ...! Your Close friends also leaks your data | सावधान...! सोशल मिडियावर मित्रांकडूनही तुम्हाला धोका...

सावधान...! सोशल मिडियावर मित्रांकडूनही तुम्हाला धोका...

Next

मुंबई : इंटरनेटच्या युगात आज तुम्ही कुठे आहात, आवड काय, काय करता या गोष्टी लपून राहत नाहीत. तुम्ही सोशल मिडियावर असा किंवा नसाल याचा काहीही फरक पडत नाही. कारण तुमचे जिगरी मित्रच तुम्हाला सोशल मिडियावर उघडे पाडत असल्याचा दावा एका अभ्यासादरम्यान करण्यात आला आहे. तुमचे मित्र थोडीथोडकी नव्हे तर तुमची 95 टक्के माहिती लीक करत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. 


अमेरिकेचे वरमोन्ट विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचे एडलेड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी हा दावा केला आहे. एखादी व्यक्ती सोशल मिडियावरील खाते डिलीट करत असेल किंवा ती व्यक्ती सोशल मिडिया वापरतच नसेल तरीही माहिती चोरली जात आहे. या अभ्यासकांनी 'नेचर ह्यूमन बिहेवियर' नावाच्या मॅग्झीनमध्ये संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तुमचा खासगीपणा सोशल मिडियासाठी सेकंड हँड स्मोक सारखा असल्याचे म्हटले आहे, जो तुमच्या आसपासच्या लोकांकडून नियंत्रित केली जात आहे. या अभ्यासासाठी त्यांनी 13905 ट्विटरवरील युजर्सच्या 3 कोटींपेक्षा जास्त ट्विटची माहिती तपासली आहे. 


फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर अकाऊंट खोलत असताना तुम्हाला वाटते की आपलीच माहिती दिली जाते. पण याबरोबर कळत नकळत मित्रांचीही माहिती दिली जाते. यानुसार तुमच्या आवडी-निवडी, राजकीय आवड, आवडीच्या वस्तू आदींची माहिती गोळा केली जाते. यामुळे तुमच्या मित्रांनाही काय आवडते किंवा काय आवडत नाही याची माहिती सोशल मिडियावर गोळा केली जाते. कारण एखादी गोष्ट घेतल्यास ती कोणाचीतरी पाहून घेतली जाते किंवा त्याला खिजवण्यासाठी, इर्शेने दुसरी चांगली वस्तू घेतली जाते. याबाबतचे फोटोही टाकले जातात. यावरून ही माहिती गोळा करता येते. फेसबुकवर काही टूल अशीही आहेत जी तुम्ही कोणत्या कंपनीचा टीशर्ट घातला आहे, तशाच प्रकारचा टीशर्ट घालणारे आणखी किती जण आहेत याचीही माहिती मिळवता येते. 

Web Title: Beware ...! Your Close friends also leaks your data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.