सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय

By अनिल भापकर | Published: February 17, 2018 07:23 PM2018-02-17T19:23:32+5:302018-02-17T19:26:46+5:30

या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यामुळे मोबाईल वर बोलताना आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो . त्यासाठी अनेक कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगले अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप म्हणजे अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डर हे होय.

Be careful! Your call is recording | सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय

सावधान ! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय

googlenewsNext
ठळक मुद्देया टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. मोबाईल वर बोलताना नेहमी काळजी घ्या ,आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो .तुमचा काही व्यवसाय आहे आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बोलून फिडबॅक घेता. अशावेळी अनेक तक्रारी ग्राहक करता. या सर्व तक्रारी ज्या तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटिक रेकॉर्ड होतील त्या तुम्ही तुमच्या टिमला ऐकवून तुमच्या ग्राहकाला समाधानी करू शकता.

पूर्वी एखाद्याच्या लँडलाईन किंवा मोबाईलवर जर काही धमकीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे फोन कॉल्स येत असतील तर पोलिसांत तक्रार केल्यानंतरे कॉल रेकॉर्ड करण्याची व्यवस्था या यंत्रणेकडून केली जात असे. त्यासाठी विशेष तांत्रिक व्यवस्थाही वापरण्यात येत असत. तेव्हा कुठे येणारे कॉल्स रेकॉर्ड केले जात. त्यानंतरच्या काळात कॉल रेकॉर्डिंगचे अनेक मशीन निघाले तसेच त्याहीनंतर अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग केली जाऊ लागली. आता मात्र या टेक्नोसॅव्ही काळात तुमच्या स्मार्टफोनवर येणारा प्रत्येक कॉल तुम्ही रेकॉर्ड करू शकता. अगदी समोरच्याला काहीही थांगपत्ता न लागू देता. त्यामुळे मोबाईल वर बोलताना नेहमी काळजी घ्या ,आपल्या तोंडून काही अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या. कारण ह्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मी असे बोललोच नव्हतो असे चालत नाही . कारण समोरचा लगेच तुमच्यासोबत झालेले संभाषण तुम्हाला ऐकवतो . त्यासाठी अनेक कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक चांगले अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप म्हणजे अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डर हे होय.

अ‍ॅटोमेटीक कॉल रेकॉर्डरचे फिचर्स


1)क्लाऊड

तुमचे जर ड्रापबॉक्स किंवा गुगल ड्राईव्हवर अकाऊंट असले तर तुमचे अ‍ॅटोमॅटीक कॉल रेकॉर्डर तुमचे कॉल रेकॉर्डिंग त्यावर सेव्ह करेल. म्हणजे तुमच्या मेमरी कार्डवरील स्पेस यामुळे वाचू शकतो.

)रेकॉर्डिंग पाथ

तुमचे कॉल्स कोठे रेकॉर्ड करायचे म्हणजे इंटरनल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे की एक्स्टर्नल मेमरी कार्डवर रेकॉर्ड करायचे तसेच कुठल्या डिरेक्टरीमध्ये रेकॉर्ड करायचे हे देखील तुम्ही सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला परत शोधायला सोपे.

३) नोटीफिकेशन

यामध्ये स्मार्ट फोनवर नोटिफिकेशन बारमध्ये दाखविण्यासाठी न्यू कॉल आणि शो कॉलर डिटेल्स आणि आफ्टर कॉल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी तुम्हाला नोटीफिकेशन हवे असल्यास त्याला सिलेक्ट करावे अन्यथा करू नये.

४)इनबॉक्स साइज

यामध्ये इनबॉक्स साइजचा अर्थ म्हणजे इनबॉक्समध्ये किती कॉल सेव्ह असावे असा होय. यामध्ये फ्री व्हर्जनमध्ये तीनशे कॉल रेकॉर्ड ठेवण्याची सोय आहे. तीनशेच्यावर कॉल रेकॉर्डिंग झाल्यास अगोदरचे कॉल रेकॉर्डिंग डिलीट होतात. त्यासाठी तुमचे काही महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग असल्यास दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये मुव्ह करून घ्यावे म्हणजे ते सेफ राहतील.

५)फिल्टर

यामध्ये रेकॉर्ड आॅल, इग्नोर आॅल आणि इग्नोर कॉन्टॅक्ट असे पर्याय आहेत. त्याचप्रमाणे कुठले कॉन्टॅक्ट वरून कॉल आल्यास रेकॉर्ड करायचे आणि कुठले कॉल इग्नोर करायचे हे तुम्ही ठरवू शकता किंवा रेकॉर्ड आॅल म्हणून सगळेच कॉल रेकॉर्ड करू शकता.


कॉल रेकॉर्डिंगचे महत्त्व

1)तुम्ही एखादी मोठी डील करता ,त्याच्या सर्व अटी आणि शर्ती तुम्ही समोरच्या पार्टीशी मोबाईलवर बोलून ठरवता. मात्र प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बैठकीला बसता तेव्हा समोरची पार्टी अचानक मी असे काही बोललोच नाही, असे म्हणते. तेव्हा तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटीक रेकॉर्ड झालेले तुमचे संभाषण पार्टीला ऐकवून शकता .कदाचित तुमच्या डिलमध्ये लाखोंचा फायदा होऊ शकतो.

2)तुमचा काही व्यवसाय आहे आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांशी बोलून फिडबॅक घेता. अशावेळी अनेक तक्रारी ग्राहक करता. या सर्व तक्रारी ज्या तुमच्या स्मार्टफोनवर अ‍ॅटोमॅटिक रेकॉर्ड होतील त्या तुम्ही तुमच्या सेल्स आणि सर्व्हीस टिमला ऐकवून  तुमच्या ग्राहकाला समाधानी करू शकता. यामुळे साहजिकच तुमचा व्यवसाय वृद्धींगत होण्यास मदत होईल.

3)तुमच्या बॉसने तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट विषयी फोन करून बऱ्याच सूचना तसेच बदल सूचविले तर या अ‍ॅटोमॅटिक कॉल रेकॉर्डरमुळे तुम्हाला बॉसने काय काय सूचना किंवा बदल सांगितले हे लगेच तुम्ही तुमचे रेकॉर्ड झालेले संभाषण परत परत ऐकून बॉसच्या सूचनांचे न चुकता पालन करू शकता. कॉल रेकॉर्डिंगचे अगणित फायदे आहेत. मात्र फक्त उदाहरणदाखल वरील उदाहरणे दिली आहेत.

Web Title: Be careful! Your call is recording

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.