Be careful! Again the 'Whatsapp Gold' risk | सावधान ! पुन्हा 'व्हॉट्सअॅप गोल्डचा ' धोका
सावधान ! पुन्हा 'व्हॉट्सअॅप गोल्डचा ' धोका

ठळक मुद्दे एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही पहिल्यांदा व्हॉट्सअॅप गोल्ड चे मेसेजेस २०१६ साली आढळून आले होते. अशा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आलेला मेसेज पुढे फॉरवर्ड न करता लगेच डिलिट करावा .

जेव्हा एखाद्या कंपनीचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात विकल्या जाते किंवा लोकप्रिय होते तेव्हा काही समाजकंटक त्या उत्पादनाचे डुप्लिकेट लगेच बाजारात आणून लोकांची फसवणूक करून डुप्लिकेट उत्पादन विकण्याचा प्रयत्न करतात . असाच काहीसा अनुभव पुन्हा  व्हॉट्सअॅप कंपनी आणि व्हॉट्सअॅप युझर्सला येत आहे.कारण पुन्हा  व्हॉट्सअॅप  युझर्सला  व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट करण्यासाठी एक लिंक येत आहे ज्यामध्ये  व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट केल्यास तुम्हाला एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच  व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने  व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे.

मात्र अशा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आलेला मेसेज पुढे फॉरवर्ड न करता लगेच डिलिट करावा कारण  दिलेल्या लिंक वरून नवीन व्हॉट्सअॅप गोल्ड साठीच्या लिंक वर क्लिक केल्यास  तुमच्या मोबाइल वर एक हिडन प्रोग्राम इन्स्टाल होतो जो तुमचा सर्व डेटा, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करतो.तेव्हा वेळीच सावध व्हा कारण परत एकदा  व्हॉट्सअॅप गोल्ड चे संकट पुन्हा घोंगावत आहे ,त्याला बळी पडू नका .

२०१६ साली सुद्धा व्हॉट्सअॅप गोल्ड

 पहिल्यांदा व्हॉट्सअॅप गोल्ड चे मेसेजेस २०१६ साली आढळून आले होते. त्यावेळी व्हॉट्सअॅप युझर्सना एक मेसेज येत होता  कि तुमचे व्हॉट्सअॅप अपग्रेड करून व्हॉट्सअॅप गोल्ड इन्स्टॉल करून घ्या. व्हॉट्सअॅप गोल्ड हे पूर्वी फ़क़्त सेलिब्रिटीसाठी उपलब्ध करण्यात आलेले होते आता ते  तुम्हाला  उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नवीन व्हॉट्सअॅप गोल्ड मध्ये तुम्ही  व्हिडिओ कॉलिंग ,फ्री कॉलिंग ,एकाच वेळी १०० हून अधिक इमेजेस अॅटॅच करण्याची सुविधा आहे, अशा अनेक भूलथापांना त्यावेळीही अनेक  व्हॉट्सअॅप युझर्स बळी पडले होते. व्हॉट्सअॅप गोल्ड च्या माध्यमातून तुमचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न २०१६ साली सुद्धा झाला होता. 

कारण मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप युझर्सना पुन्हा एक मेसेज येत आहे कि तुमचे व्हॉट्सअॅप अपग्रेड करून व्हॉट्सअॅप गोल्ड इन्स्टॉल करून घ्या. एकाच वेळी १०० हून अधिक इमेजेस अॅटॅच करण्याची सुविधा आहे,तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच  व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने  व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे. मात्र अशा कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आलेला मेसेज पुढे फॉरवर्ड न करता लगेच डिलिट करावा .

यापूर्वीही एकदा व्हॉट्सअॅप प्लस नावाने युझर्सची  फसवणूक झालेली होती . तेव्हा व्हॉट्सअॅपनेच  सर्च करून व्हॉट्सअॅप प्लस असलेल्या मोबाइलची सेवा २४ तासांसाठी खंडीत केली होती. आताही काही लोकाना व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जन च्या  नावाखाली फसवण्याचे प्रकार सुरु झाले आहॆत. तेव्हा आपण काळजी  घेतलेली बरी .


Web Title: Be careful! Again the 'Whatsapp Gold' risk
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.