घामाची दुर्गंधी ! नव्हे तुमचा पासवर्ड

By अनिल भापकर | Published: February 2, 2018 03:56 PM2018-02-02T15:56:41+5:302018-02-02T15:59:00+5:30

अनेक वर्षांपासून आपण विविध टीव्ही सिरियल्स, तसेच चित्रपटांमध्ये बघत आलो आहोत की , एखाद्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस श्वानपथकाची मदत घेतात. म्हणजे घटनास्थळी पडलेल्या वस्तू किंवा खुनासाठी वापरलेल्या हत्याराला खून करणाऱ्याचा झालेल्या स्पर्शाच्या वासावरून ते श्वान खुन्याचा माग घेण्याचा प्रयत्न करते. यावरून असे सिद्ध होते कि प्रत्येक माणसाच्या शरीराचा वास हा भिन्न असतो. हाच धागा पकडून स्पेनमधील काही शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.

Bad odor! No Your Password | घामाची दुर्गंधी ! नव्हे तुमचा पासवर्ड

घामाची दुर्गंधी ! नव्हे तुमचा पासवर्ड

googlenewsNext
ठळक मुद्देस्पेनमधील काही शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.पूर्वी सही ही एकमेव ओळख होती. बँकेत सुद्धा विविध व्यवहार करताना सही हा एकमेव आधार होता. त्यानंतर विविध ठिकाणी प्रवेश करताना गेटवर सही घेतली जात होती.त्यानंतर जमाना आला तो फिंगर पास मशीन आणि फेस डिटेक्शन मशीनचा. आता तर या सोबतच व्हाईस डिटेक्शन, आयरीस डिटेक्शन आणि त्याही पुढचे एक पाऊल म्हणजे बॉडी ओडर डिटेक्शन, अर्थात घामाची दुर्गंधी म्हणजेच एक स्वतंत्र ओळख म्हणून हे तंत्रज्ञान लोकप्रिय होऊ शकते.

अनेक वर्षांपासून आपण विविध टीव्ही सिरियल्स, तसेच चित्रपटांमध्ये बघत आलो आहोत की , एखाद्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस श्वानपथकाची  मदत घेतात. म्हणजे घटनास्थळी पडलेल्या वस्तू किंवा खुनासाठी वापरलेल्या हत्याराला खून करणाऱ्याचा झालेल्या स्पर्शाच्या वासावरून ते श्वान खुन्याचा माग घेण्याचा प्रयत्न करते. यावरून असे सिद्ध होते कि प्रत्येक माणसाच्या शरीराचा वास हा भिन्न असतो. हाच धागा पकडून स्पेनमधील काही
शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीराचा वास म्हणजेच घाम हा सुद्धा प्रत्येकाची स्वतंत्र ओळख बनू शकतो,असे सिद्ध केले.म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच भविष्यात तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.

बायोमेट्रिक मशिन कुठे वापरतात ?

आता जसे एखाद्या अति महत्वाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी दारावरच फिंगरपास मशीन किंवा फेस डिटेक्शन मशीन बसविलेले असते, म्हणजे ज्या लोकांचे फिंगर किंवा फेस त्या मशीनमध्ये नोंद केलेले आहे, अशाच लोकाना अशा महत्त्वाच्या ठिकाणी  प्रवेश मिळू शकतो.म्हणजे अनधिकृत पणे लोक त्या ठिकाणी प्रवेश करू शकणार नाहीत; मात्र आता फेस डिटेक्शन आणि फिंगरपास मशीनच्या बरोबरीने बॉडी ओडर (शरीराचा वास) मशीनसुद्धा लवकरच अशा ठिकाणी बघायला मिळतील, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विशेष म्हणजे बॉडी ओडर आयडेंटिफिकेशन मशीनची सत्यता ही ८५ टक्क्यांहून अधिक असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे. म्हणजे इथून पुढे अनुभट्टी, एअरपोर्ट, विविध मॉल्स, सर्व्हर रूम्स आदी महत्त्वाच्या ठिकाणी बायोमेट्रिक आयडेंटिटी म्हणून बॉडीओडर आयडेंटिफिकेशन मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. म्हणजेच अशा ठिकाणी  प्रवेश करायचा तर तुमच्या बॉडी ओडर म्हणजेच शरीराचा वास त्या ठिकाणी नोंद केलेला असेल, तरच तुम्हाला अशा ठिकाणी प्रवेश मिळू शकेल. म्हणजेच तुमच्या शरीराचा वास (घाम) हाच तुमचा पासवर्ड म्हणून सिद्ध होईल.


सध्या वापरात असलेले बायोमेट्रिक तंत्रज्ञान

सध्या विविध बायोमेट्रिक मशीन वापरात असून त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे फिंगरपास मशीन, फेस डिटेक्शन मशीन,सिग्नेचर डिटेक्शन, व्हाईस डिटेक्शन मशीन, रेटिना डिटेक्शन मशीन आदी विविध प्रकारचे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन मशीन वापरात आहेत. यापैकी प्रत्येकाची सत्यता ही कमी-अधिक प्रमाणात असू शकते; मात्र अनधिकृत रित्या लोकांना महत्त्वाच्या जागी प्रवेश देण्यापासून रोखण्यास ही यंत्रणा बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. मात्र बॉडी ओडर डिटेक्शन मशीनची सत्यता ही सर्वांत जास्त असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

स्वतंत्र ओळख म्हणून बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचे महत्त्व

बायोमेट्रिक तंत्रज्ञानामुळे नको त्या ठिकाणी नको त्या लोकांचा  वावर आपण रोखू शकतो. पूर्वी सही ही एकमेव ओळख होती. बँकेत सुद्धा विविध व्यवहार करताना सही हा एकमेव आधार होता. त्यानंतर विविध ठिकाणी प्रवेश करताना गेटवर सही घेतली जात होती.त्यानंतर जमाना आला तो फिंगर पास मशीन आणि फेस डिटेक्शन मशीनचा. आता तर या सोबतच व्हाईस डिटेक्शन, आयरीस डिटेक्शन आणि त्याही पुढचे एक पाऊल म्हणजे बॉडी ओडर डिटेक्शन, अर्थात घामाची दुर्गंधी म्हणजेच एक स्वतंत्र ओळख म्हणून हे तंत्रज्ञान लोकप्रिय होऊ शकते.

Web Title: Bad odor! No Your Password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.