नॅनोएज डिस्प्लेयुक्त ASUS विवोबुक एस १४ लॅपटॉप

By शेखर पाटील | Published: February 19, 2018 02:53 PM2018-02-19T14:53:32+5:302018-02-19T14:54:01+5:30

ASUS कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा विवोबुक एस १४ हा लॅपटॉप तीन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे.

ASUS VivoBook S14 Laptop | नॅनोएज डिस्प्लेयुक्त ASUS विवोबुक एस १४ लॅपटॉप

नॅनोएज डिस्प्लेयुक्त ASUS विवोबुक एस १४ लॅपटॉप

googlenewsNext

ASUS कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा विवोबुक एस १४ हा लॅपटॉप तीन व्हेरियंटमध्ये सादर केला आहे.

कोणत्याही लॅपटॉपमध्ये डिस्प्ले हा सर्वात महत्वाचा घटक असतो. यामुळे, ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी कंपन्या उत्तमोत्तम डिस्प्लेयुक्त मॉडेल्सवर भर देत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, असुसच्या विवोबुक एस १४ या मॉडेलमध्ये नॅनोएज या प्रकारातील स्क्रीन दिलेला आहे. हा डिस्प्ले १४ इंच आकारमानाचा असून फुल एचडी क्षमतेचा आहे. यात टचपॅडसह ब्लॅकलीट या प्रकारातील किबोर्ड प्रदान करण्यात आला आहे. याची मेटॅलिक डिझाईनसुध्दा अतिशय आकर्षक अशी आहे. हा लॅपटॉप गोल्ड आणि ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

विवोबुक एस १४ हे लॅपटॉप सातव्या पिढीतील कोअर आय३, आठव्या पिढीतील कोअर आय५ आणि आठव्या पिढीतील कोअर आय७ या तीन प्रोसेसरने युक्त असणार्‍या तीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. या तिन्ही व्हेरियंटची रॅम ३ जीबी असून २५६ जीबीपर्यंत एसएसडी तर १ टेराबाईटपर्यंत एचडीडी या प्रकारातील स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यात तीन लिथियम आयन सेलयुक्त बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच अवघ्या ४९ मिनिटांमध्ये ही बॅटरी तब्बल ६० टक्के चार्ज होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी विवोबुक एस १४ या मॉडेलमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी २.०, युएसबी ३.१, एचडीएमआय आदी पर्याय दिलेले आहेत. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ५४,९९० रूपयांपासून सुरू होणार असून हे लॅपटॉप ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
 

Web Title: ASUS VivoBook S14 Laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.