भारतात आयफोनच्या किंमतीत वाढ, अशा असतील नव्या किंमती

By ऑनलाइन लोकमत on Mon, February 05, 2018 1:02pm

अ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - अ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एक फेब्रुवारी अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेलटी यांनी मोबाईलच्या कस्टम ड्युटीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ केली होती. आता भारतात आयात केलेल्या फोनवर 20 टक्के कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. त्यामुळं आयफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. खाली दिल्याप्रमाणे असतील नव्या आयफोनच्या किंमती. 

अॅपलचा आयफोन एक्स 64 जीबी आणि 256 जीबी हे दोन्ही फोन महागले आहेत. 64 जीबीचा 92, 430 रुपयावरुन 95,390 ऐवढी झाली आहे. तर 256 जीबीच्या आयफोनची किंमत 1,05,720 रुपयावरुन 1,08,930 रुपये झाली आहे. 

आयफोन 8 - 64 जीबी  फोन 66, 120 रुपयांवरुन 67,940 झाली आहे. तर 256 जीबीची किंमत 79,420 रुपयावरुन वाढून 81, 500 रुपये झाली आहे. iPhone 8 Plus चा 64GB ची किंमत 75, 450 रुपयावरुन 77,560 रुपये झाली तर 256GB ची किंमत 91,110 रुपये झाली आहे. अॅपलचा आय़फोन 7 मॉडेलचा 32 जीबीची किंमत 50,810 वरुन वाढून 52, 370 झाली आहे. तर 128 जीबीची किंमत 59, 910 वरुन 61, 560 झाली आहे.     आयफोन - 7 प्लस 32 जीबी 62840 तर 128 जीबी 72,060 रुपयाला मिळणार आहे. आयफोन-6 एस 32 जीबी किंमत 42,900 तर 128 जीबी 52100 रुपये झाली आहे. आयफोन-6 प्लसची किंमत  52,240 (32 जीबी) 61,450 (128 जीबी) झाली आहे.  आयफोन - 6 चा 32 जीबी मॉडेल 31,900 रुपयांना मिळेल. तर आयफोन एसइ 32 जीबीचा 26000 हजार तर 128 जीबीचा 35000 रुपयांना मिळेल. 

संबंधित

जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट 
Video: iPhone साठी कौमार्य विकायला निघाली, रूममध्ये बोली लावणारे आले आणि...  
चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू 
iPhone 8 आणि iPhone 8 Plus ची भारतात आजपासून विक्री सुरू, कुठे कराल खरेदी?
आयफोन खरेदी करणा-यांसाठी Good News, जिओकडून 10 हजार रूपयांची सूट

तंत्रज्ञान कडून आणखी

'अॅपल' घेणारे लोक जास्त समाधानी असतात...
निवडणुकांच्या तोंडावर शंभरावर फेसबुक, इन्स्टावरील अकाऊंट ब्लॉक
2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम 
आता बनवा आपलं स्वतःचं व्हॉट्सअॅप स्टिकर, जाणून घ्या कसं...
व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!

आणखी वाचा