अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी

By शेखर पाटील | Published: May 30, 2018 06:21 PM2018-05-30T18:21:21+5:302018-05-30T18:21:21+5:30

अमेझॉनने आपल्या 'अमेझॉन नाऊ' या सेवेला 'प्राईम नाऊ' या नावात परिवर्तीत केले असून याच्या माध्यमातून ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरीसह अन्य सेवा देऊ केल्या आहेत.

Amazon Prime customers will get superfast delivery | अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी

अमेझॉन प्राईम नाऊच्या ग्राहकांना मिळणार सुपरफास्ट डिलीव्हरी

googlenewsNext

अमेझॉनने आपल्या 'अमेझॉन नाऊ' या सेवेला 'प्राईम नाऊ' या नावात परिवर्तीत केले असून याच्या माध्यमातून ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरीसह अन्य सेवा देऊ केल्या आहेत.

भारतात निवडक शहरांमधील ग्राहकांसाठी अमेझॉन नाऊ ही सेवा आधीपासून सुरू करण्यात आली आहे. याला आता प्राईम नाऊ या नावासह नव्याने सादर करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत ग्राहकांना सुपरफास्ट डिलीव्हरी मिळणार आहे. या माध्यमातून सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान ग्राहकाला फक्त दोन तासांमध्ये त्याने ऑर्डर केलेल्या वस्तू घरपोच मिळणार आहेत. अमेझॉन प्राईम नाऊ या सेवेत तब्बल १० हजार प्रॉडक्टचा समावेश करण्यात आला आहे. यात ताजी फळे, भाज्या, किराणा वस्तू आदींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यासाठी अमेझॉनने बिगबझारसह अनेक स्थानिक सुरशॉपीज आणि किराणा दुकानदारांशी सहकार्याचा करार केला आहे. याशिवाय, कंपनीने १५ फुलफिलमेंट सेंटर्सदेखील सुरू केले आहेत. ही सेवा फक्त अमेझॉन अ‍ॅप वापरणार्‍यांना प्रदान करण्यात आली आहे. सध्या बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली आदी महानगरांमध्ये याला सुरू करण्यात आले असून लवकरच याचा विस्तार करण्यात येणार आहे.

दरम्यान, अमेझॉन इंडियाने होम व किचन या नावाने नवीन वर्गवारीदेखील सुरू केलेली आहे. यात ग्राहकांना सर्वाधीक लोकप्रिय असणारी (बेस्ट सेलींग) उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ग्राहकांना तब्बल ३० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात आल्याचे अमेझॉन कंपनीने जाहीर केले आहे.

Web Title: Amazon Prime customers will get superfast delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.