Amazon collided with Flipkart's Big Shopping Days Sale on July 16 | अॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale

नवी दिल्ली : ई-कॉमर्स नेटवर्किंग साइट अॅमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale ला मिळालेला प्रतिसाद पाहून फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. 

फिल्पकार्टने 16 ते 19 जुलैपर्यंत Big Shopping Days नावाने सेलचे आयोजन केले आहे. या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटगरीतील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल शिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टीव्ही यांसारख्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. 'सेल हो तो ऐसी' अशी, कंपनीने या सेलला टॅगलाइन दिली आहे. दरम्यान, अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे, तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे. 

इंस्टेंट डिस्काउंट आणि नो कॉस्ट इएमआय...
 अॅमेझॉन ला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI)शी भागीदारी केली आहे. SBI च्या क्रेडिट कार्डचा वापर करणा-या ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फिल्पकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नो-कॉस्ट EMI च्या ऑप्शन देत आहे. 

या स्मार्टफोन्सवर मिळणार सूट...
फ्लिपकार्टने सेलमध्ये जवळपास 1500 हून अधिक स्मार्टफोन्सवर सूट देण्याची शक्यता आहे. यामध्ये गुगल पिक्सल 2 (128 जीबी) स्मार्टफोन ग्राहकांना 42999 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Panasonic P95 या स्मार्टफोनला 3999 रुपये आणि  Honor 9i (4GB रॅम, 64 GB स्टोरेज) हा स्मार्टफोन 14999 रुपयांना विकण्यात येणार आहे.  

इतर प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यापर्यंत सूट...
इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येत आहे. गृहपयोगी वस्तू आणि टीव्हीवर 70 टक्के सूट मिळणार आहे. 
 


Web Title: Amazon collided with Flipkart's Big Shopping Days Sale on July 16
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.