500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर !

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 08, 2018 4:20pm

या टेलीकॉम कंपन्यांचा 60-70 रूपयांचा डेटा प्लॅन देखील असेल पण केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच हा धमाका प्लॅन असणार आहे

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया एक प्लॅन बनवत आहेत. रिलायन्स जिओने 4G फीचर फोन लॉन्च केल्यानंतर सध्या बाजारात या किंमतीचे अनेक फोन उपलब्ध आहेत. 1000 रूपयांमध्ये 4G फीचर फोन देखील सादर करण्यात आले आहेत. पण आता टेलीकॉम कंपन्या याहून स्वस्त 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. हा स्मार्टफोन केवळ 500 रूपयांमध्ये असेल. 

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  देशातील एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या प्रमुख टेलीकॉम कंपन्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांसोबत मिळून 500 रूपयांमध्ये 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. या फोनद्वारे रिलायन्स जिओच्या 4G फीचर फोनला तगडी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोनसोबत 60-70 रूपयांचा प्लॅन - टेलीकॉम कंपन्या यूजर्ससाठी 60-70 रूपयांचा प्लॅन देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये ग्राहकाला एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह इंटरनेट डेटा सर्व्हिस आणि कॉलिंग, मेसेजिंग देखील करता येईल. कंपन्यांचा हा 60-70 रूपयांचा प्लॅन केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच असणार आहे. हा प्लॅन जिओच्या 49 रूपयांच्या प्लॅनशी मिळताजुळता आहे.

 

संबंधित

व्होडाफोन - आयडियाच्या 'युती'मुळे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
वोडाफोन-आयडिया लवकरच विलीन
बनावट कागदपत्रांद्वारे १५९ सिम घेणा-या दोघांना अटक
एअरटेल, आयडियाची टीडीसॅटकडे धाव
वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा

तंत्रज्ञान कडून आणखी

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा
सॅमसंग गॅलेक्सी जे ८ (२०१८) मॉडेलचे अनावरण
हुआवे वाय ५ प्राईमची नवीन आवृत्ती
लवकरच येणार गुगलचा स्वतंत्र एआर हेडसेट
शाओमीचे खास बालकांसाठी फोन वॉच

आणखी वाचा