एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

By अनिल भापकर | Published: January 16, 2018 08:01 PM2018-01-16T20:01:55+5:302018-01-16T20:04:58+5:30

सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

Air Self: Now there is no need for sacrifice | एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

एअर सेल्फी : आता बलिदानाची गरज नाही

ठळक मुद्देसेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही .यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .

मोबाईल मधील कॅमेरा जेव्हापासून पावरफुल झाला तेव्हापासून अनेकांमधील फोटोग्राफीचा सुप्त गुण जागा झाला. वाढदिवस असो कि बाहेर फिरायला जाणे असो ग्रुप फोटो काढून ते लगेच सोशल मीडिया वर अपलोड करण्याचा ट्रेंड हल्ली टेक्नोसॅव्ही पिढीमध्ये दिसून येतो. यामुळेच सेल्फीची लोकप्रियता वाढली आहे. सेल्फी काढणे चांगले कि वाईट यावर अनेक खलबते झाली आहे. कारण सेल्फीचे जेवढे फायदे तेवढेच सेल्फी मुळे अपघात होण्याचे प्रमाणही भरपूर उघडकीस आले आहे.मात्र सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाही . सेल्फी स्टिक मुळे काही प्रमाणात ही समस्या दूर झाली असली तरी सुद्धा ग्रुप मधील सर्व जण फोटोत येत नाही. मग यावर उपाय काय तर कोणीतरी एका मित्राने बलिदान देऊन इतरांचा फोटो काढायचा. मात्र फोटो कोणी काढायचा म्हणजेच बलिदान कोणी द्यायचे यावर सुद्धा अनेकदा ग्रुप मध्ये वाद होतात. कारण प्रत्येकालाच फोटोत आपण असावे असे वाटते. मात्र आता एक असे तंत्रज्ञान आले आहे ज्याचा वापर करून तुम्ही कुणाचेही बलिदान न देता सेल्फी काढू शकता अगदी कितीही मोठा मित्रांचा ग्रुप असला तरीही . या तंत्रज्ञानाचे नाव आहे एअर सेल्फी .आज या एअर सेल्फी विषयी जाणून घेऊया .

काय आहे नेमकं एअर सेल्फी ?
हा एक स्मार्टफोन साईज चा आणि वजनाने हलका असा ड्रोन कॅमेरा आहे. अॅल्युमिनियमपासून बनविलेल्या या ड्रोनचे वजन फक्त ५० ते ६५ ग्रॅम आहे . हा ड्रोन कॅमेरा  ऍप च्या माध्यमातून स्मार्टफोन वरून कन्ट्रोल केल्या जातो . या ड्रोनला ५ एमपीचा एच डी कॅमेरा दिला गेला आहे. हा ड्रोन कॅमेरा स्वतः च्या वायफाय ने स्मार्टफोन ला कनेक्ट करता येतो . यामध्ये उच्च प्रतीचे विविध सेन्सर वापरले असून त्यांच्या मदतीने उच्च प्रतीचे फोटो काढता येतात .या ड्रोन मध्ये चार मायक्रो मोटर्स असून हे ड्रोन २० मीटर उंचीवरूनही झूम करून चांगल्या सेल्फी काढू शकते. याच्या सहाय्याने मोठ्या रेंजमध्येही सेल्फी घेता येतात. हे ड्रोन वायफायशी कनेक्ट होते. उडण्यासाठी तसेच फोटो क्लिक करण्यासाठी त्याला पॉवरफुल बॅटरी दिली गेली आहे . या ड्रोन मध्ये वापरलेली बॅटरी ३० मिनिटात चार्ज करता येते. या ड्रोन मध्ये ४ जीबीचे स्टोरेजही आहे.

तर मग मस्त आहे ना सेल्फी ची लोकप्रियता आणखी वाढविणारे हे एअर सेल्फी तंत्रज्ञान .

Web Title: Air Self: Now there is no need for sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.