ओलाकडून ‘फूड पांडा’चे अधिग्रहण; लवकरच फूड डिलिव्हरीत पदार्पण !

By शेखर पाटील | Published: December 21, 2017 10:32 AM2017-12-21T10:32:49+5:302017-12-21T11:49:14+5:30

अ‍ॅपवर आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर ओलाने आता ‘फूड पांडा’ या कंपनीचे अधिग्रहण केले असून लवकरच फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत.

Acquisition of Food Panda from Olas; Food delivery debut soon! | ओलाकडून ‘फूड पांडा’चे अधिग्रहण; लवकरच फूड डिलिव्हरीत पदार्पण !

ओलाकडून ‘फूड पांडा’चे अधिग्रहण; लवकरच फूड डिलिव्हरीत पदार्पण !

googlenewsNext

अ‍ॅपवर आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर ओलाने आता ‘फूड पांडा’ या कंपनीचे अधिग्रहण केले असून लवकरच फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत.

‘डिलीव्हरी हिरो’ या जर्मन कंपनीने अलीकडेच ‘फूड पांडा’ला विकत घेतले होते. आता मात्र याची मालकी ओलाकडे आली आहे. हा व्यवहार नेमका किती रूपयांचा आहे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, ओला लवकरच ऑनलाईन फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात उतरणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यासाठी ओला तब्बल २० कोटी डॉलर्स (अंदाजे १२८१ कोटी रूपये) इतकी गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ‘फूड पांडा’ला भारतातल्या १०० शहरांमधील सुमारे १५ हजार उपहारगृहे संलग्न आहेत. ओलाच्या पंखाखाली आल्यानंतर याचा जलद गतीने विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओला आणि उबर या दोन अ‍ॅपवर आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर्समधील स्पर्धा कुणापासून लपून राहिलेली नाही. एकमेकांवर मात करण्यासाठी या दोन्ही कंपन्या सातत्याने प्रयत्न करत असतात. या पार्श्‍वभूमिवर आता या दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील स्पर्धेचे नवीन मैदान हे फूड डिलीव्हरी असेल असे स्पष्ट झाले आहे. कारण उबरने अलीकडेच आपली ‘उबर इटस्’ ही फूड डिलीव्हरी सेवा भारतात लाँच केला आहे. याच्याच पावलावर पाऊल ठेवत ओलाची फूड पांडा सेवा सुरू होत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Web Title: Acquisition of Food Panda from Olas; Food delivery debut soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.