तब्बल 5000 mAh बॅटरी आणि शानदार फीचर्स! पॅनासोनिक Eluga A4 भारतात लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 02:34 PM2017-11-06T14:34:00+5:302017-11-06T14:35:30+5:30

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा या मालिकेतील ए ४ हा स्मार्टफोन १२,४९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

5000mAh battery and great features! Launched in Panasonic Eluga A4 India | तब्बल 5000 mAh बॅटरी आणि शानदार फीचर्स! पॅनासोनिक Eluga A4 भारतात लॉन्च

तब्बल 5000 mAh बॅटरी आणि शानदार फीचर्स! पॅनासोनिक Eluga A4 भारतात लॉन्च

Next

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा या मालिकेतील ए ४ हा स्मार्टफोन १२,४९० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

पॅनासोनिक एल्युगा ए ४ या मॉडेलमध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या मदतीने युजरला दीर्घ काळापर्यंत बॅकअप मिळणार असल्यामुळे हे फिचर या स्मार्टफोनचा सेलींग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. पॅनासोनिक कंपनीने याआधी एल्युगा रे ७०० हा इतक्याच म्हणजे ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर पॅनासोनिकने पुन्हा एकदा जंबो बॅटरी या फिचरवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता, पॅनासोनिक एल्युगा ए ४ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

पॅनासोनिक एल्युगा ए ४ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात याच कंपनीने विकसित केलेला अर्बो हा व्हर्च्युअल असिस्टंटही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फक्त ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध करण्यात आला आहे. अर्थात पॅनासोनिक शॉपीजसह अन्य शॉपीजमधून हे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

 

Web Title: 5000mAh battery and great features! Launched in Panasonic Eluga A4 India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.