ठळक मुद्देफ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने सॅमसंग मोबाइल फेस्ट सुरू केला आहे.

मुंबई- फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. ही ऑफर नवीन मोबाइल घेणाऱ्यांसाठी चांगलीच फायद्याची ठरणार आहे. फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने सॅमसंग मोबाइल फेस्ट सुरू केला असून या फेस्टमध्ये तुम्ही तुमचा जूना मोबाइल देऊन नवीन मोबाइल विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे हा फेस्ट खास सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 7 या फोनसाठी आहे. सॅमसंग एस 7 या स्मार्टफोनची किंमत 46 हजार आहे. पण हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 4990 रूपयांना घेता येणार आहे. मसंग गॅलेक्स एस 7 या फोनची किंमत ही 46 हजार असून फ्लिपकार्टवर डिस्काऊंट देण्यात आलं आहे. डिस्काऊंटमुळे हा मोबाइल 29 हजार 990 रूपयाला फ्लिपकार्टवर मिळतो आहे.
 

29 हजार 990 रूपये किंमतीवरही तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा जुना फोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज करायचा आहे. फ्लिपकार्टवर जुन्या फोनवर 25 हजार रूपयांपर्यंतचं डिस्काऊंट मिळणार आहे. ज्याचा फायदा ग्राहकांना होणार असून 4 हजार 990 रूपयांमध्ये फोन घेता येईल. फ्लिपकार्टवर सॅमसंग एस 7 चा स्टॉक असेपर्यंत हा मोबाइल घेता येईल. सहा नोव्हेंबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत हा फेस्ट असेल. एका ग्राहकाला फक्त एकच मोबाइल ऑर्डर करता येणार आहे.

2016 मध्ये सॅमसंग एस 7 लॉन्च झाला तेव्हा त्याची किंमत 48 हजार 900 रूपये होती. 5.1 इंचाचा डिसप्ले, 12 मेगापिक्सेल कॅमेरा, 4 जीबी रॅम आणि 3000 मेगाव्हॅट बॅटरी क्षमता असे फोनचे फीचर आहेत.