महापालिका निवडणूक : परभणीत काँग्रेसचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'

 • First Published :21-April-2017 : 13:00:30 Last Updated at: 21-April-2017 : 15:25:30

 • ऑनलाइऩ लोकमत 

  परभणी, दि. 21 - एकही आमदार नसलेल्या परभणी जिल्ह्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. परभणी महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, 65 सदस्यांच्या परभणी महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट आहे. परभणीमध्ये काँग्रेस उमेदवार 28 जागांवर विजय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर तर, शिवसेना-भाजपा प्रत्येकी 6-6 जागांवर विजय मिळवला आहे. 
   
  परभणीमध्ये काँग्रेसची ही कामगिरी अनपेक्षित अशीच आहे. कारण जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाहीय. परभणीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला चीतपट केले आहे. राष्ट्रवादीचे परभणीमध्ये तीन आमदार आहेत. परभणीतील पक्षाची ही कामगिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी आहे. 
   
  परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व आहे. इथे खासदार आणि एक आमदार शिवसेनेचा आहे. परभणी महापालिकेसाठी बुधवारी  70 टक्के मतदान झाले होते.
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या