पाणीवाहिनीसाठी फोडला रस्ता

  • First Published :21-March-2017 : 05:26:19

  • मार्केट यार्ड : येथील महर्षीनगर, झांबरे पथ परिसरात काही महिन्यांपूर्वी केलेल्या काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे.

    सौभाग्य मंगल कार्यालयाजवळ आदर्शनगर सोसायटीचे पाण्याच्या वाहिनीचे जोडणीचे काम करताना मुख्य काँक्रिट रस्ता फोडण्यात आला. काँक्रिट रस्ता तयार करताना पाण्याच्या वाहिनीसाठी कोणतेही नियोजन न केल्यामुळे रस्ताच फोडण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील कामांचा विचार न करता हे काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे काँक्रिट रस्ता फोडण्यात आला होता. नंतर त्याची डागडुजीही केली नाही, परिणामी खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीचालकांचे अपघात होण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे रस्ता तयार करताना भविष्यातील संभाव्य कामे लक्षात घेऊनच तो करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS