अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे नुकसान

  • First Published :08-January-2017 : 18:42:14

  • ऑनलाइन लोकमत

    नवी दिल्ली, दि. 8 - अमेरिका आणि चीन व्यापार युद्धात भारताचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि चीनसोबत व्यापार युद्ध छेडल्यास त्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. त्यासाठी भारताला अगोदरच सावध पावले उचलावी लागतील, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

    असोचेमने या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे काही निवडक वस्तूूंबाबत भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या निशाण्यावर चीन आणि मेक्सिको हे देश आहे. पण भारतालाही सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकेच्या नव्या प्रशासनासोबत भारताला संबंध वाढवावे लागतील. त्यामुळे अमेरिकेतील नोकऱ्यांबाबतची काळजी दूर होऊ शकेल, असंही मत असोचेमने व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या