बँका खराब नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत - रिझर्व्ह बँक

By admin | Published: April 29, 2017 10:24 AM2017-04-29T10:24:06+5:302017-04-29T11:59:28+5:30

बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे

Banks can not refuse to accept bad notes - RBI | बँका खराब नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत - रिझर्व्ह बँक

बँका खराब नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाहीत - रिझर्व्ह बँक

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असंही आरबीआयने सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसांत बँका रंग लागलेल्या तसंच ज्यांच्यावर काही लिहिलं आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खासकरुन 500 आणि 2000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. 
 
सोशल मीडियावर अशा नोटा बँका स्वीकारणार नसल्याची अफवा परसली होती. बँकांही आठमुठेपणा दाखवत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या होत्या. अफवा वेगाने पसरु लागल्यानंतर आरबीआयने दखल घेत आपल्या 2013 मधील आदेशाची आठवण करुन दिली. खराब नोटा स्वीकारण्यासंबंधी आपण कोणताच आदेश दिला नसल्याचं आरबीआयने त्यावेळी सांगितलं होतं. 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे की, नोटांवर लिहिण्यासंबंधी जो आदेश देण्यात आला होता तो बँक कर्मचा-यांसाठी होता. त्यांनी नोटांवर काही लिहू नये असं सांगितलं होतं. अनेक बँक कर्मचा-यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचं लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत. आरबीआयने सरकारी कर्मचारी, संस्था आणि सामान्यांना नोटांवर काही न लिहिता त्यांना व्यवस्थित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 
 

Web Title: Banks can not refuse to accept bad notes - RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.