हॉकी : नेदरलँड्सला धक्का देण्यास भारत सज्ज

  • First Published :19-June-2017 : 23:49:19

  • लंडन : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ असे लोळवल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भारतीय संघ हॉकी वर्ल्ड लीग उपांत्य फेरीच्या ‘ब’ गटात बलाढ्य नेदरलँड्सविरुध्द खेळण्यास सज्ज झाला आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलँड्सविरुध्द कामगिरीत सातत्य राखून विजय मिळवण्याचा विश्वास भारतीयांना आहे.

    जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाने स्पर्धेच्या ‘ब’ गटात आतापर्यंत झालेल्या आपल्या तिन्ही सामन्यांत बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सने आपले दोन्ही सामने जिंकताना दुसरे स्थान मिळवले आहे.

    त्याचवेळी, याआधीच उपांत्यपुर्व फेरीत जागा निश्चित केलेला भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध कोणत्याही दबावाशिवाय खेळेल. आतापर्यंतच्या सामन्यात भारताकडून रमनदीप सिंग, आकाशदीप सिंग आणि तलविंदर सिंग यांनी चमकदार कामगिरी केली असून नेदरलँड्सविरुद्ध त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. मध्यरक्षक म्हणून अनुभवी सरदार सिंग याच्यावर मोठी मदार असेल. तसेच, कर्णधार मनप्रीत सिंगची सरदारला मोलाची साथ मिळेल. दखल घेण्याची बाब म्हणजे, रुपिंदर पाल सिंग सारख्या महत्त्वाच्या खेळाडूच्या अनुपस्थित हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखालील बचावफळीने शानदार कामगिरी केली. बचावफळीच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने आतापर्यंत केवळ दोन गोल स्विकारले आहेतमहत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS