नारायण, उथप्पाकडून गुजरातची धुलाई

  • First Published :21-April-2017 : 21:38:05

  • ऑनलाइन लोकमत
    कोलकाता, दि. 21 - सुनील नारायणनने दिलेल्या धमाकेदार सुरुवातीनंतर रॉबिन उथप्पाने केलेल्या 72 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने आज आयपीएलमध्ये सुरू असलेल्या लढतीत गुजरात लायन्ससमोर 188 धावांचे आव्हान ठेवले. गुणतालिकेत शेवटच्या स्थानी असलेल्या गुजरातची गोलंदाजी कोलकात्यासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरली. कोलकात्याच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत 20 षटकात 5 बाद 187 धावा कुटल्या. 
    गुजरातने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाता नाईटरायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर सुनील नारायणने कोलकात्याला तुफानी सुरुवात करून दिली. त्याने 17 चेंडून 42 धावा कुटल्या. नारायण बाद झाल्यावर गंभीर आणि उथप्पाने 69 धावा जोडत संघाला सुस्थितीत पोहोचवले. गंभीर 33 धावा काढून बाद झाला. पण उथप्पाने 48 चेंडूत 72 धावा कुटल्या. 
    मात्र शेवटच्या 5 षटकांत कोलकात्याला फार धावा फटकावता आल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर कोलकात्याला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. गुजरातकडून सुरेश रैना, प्रवीण कुमार, जेम्स फॉकनर आणि थम्पी यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. 
महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या