रॉजर फेडररला विजेतेपद

  • First Published :21-March-2017 : 01:04:54

  • इंडियन वेल्स : स्टेनवावरिंकाचा ६-४, ७-५ ने पराभव करीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विक्रमाची बरोबरी साधत पाचव्यांदा एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली. गेल्या वर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या फेडररने पुनरागमन करीत जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकत १८ वे ग्रॅण्डस्लॅम आपल्या नावे केले होते. त्यानंतर स्विस फायनलमधील विजयानंतर फेडररने नोव्हाक जोकोविचच्या पाच विजेतेपदांसोबत बरोबरी साधली. याआधी, फेडररने २००४, २००५, २००६ आणि २०१२ मध्ये अजिंक्यपद पटकाविले होते.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS